वॉशिंग्टन - खराब हवामानामुळे नासा आणि स्पेसएक्सने 27 मे रोजी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून दोन अंतराळवीरांचे स्पेस सेंटरला जाण्यासाठी होणारे ऐतिहासिक उड्डाण स्थगित केले.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “हवामान परिस्थितीमुळे प्रक्षेपण रद्द होत आहे,” असे ट्विट नासाने केले आहे.
'उड्डाण मार्गातील प्रतिकूल हवामानामुळे प्रक्षेपण लांबणीवर पडले. पुढील प्रक्षेपण शनिवारी (30 मे) नियोजित केले आहे,' असे स्पेसएक्सने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.
स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटमध्ये क्रू ड्रॅगन या अंतराळ यानाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS - इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) घेऊन जाईल. या यानातून नासाचे अनुभवी अंतराळवीर बॉब बेहनकेन आणि डग हर्ले हे तेथे (आयएसएस) जातील.
२०११ नंतर अमेरिकन अंतराळवीरांनी अमेरिकन भूमीवरून अंतराळ स्थानकाकडे अमेरिकन रॉकेटने उड्डाण करण्याची ही पहिली वेळ असेल.