ETV Bharat / international

चांद्र मोहिमेसाठी नासाकडून अठरा अंतराळवीरांची नावे जाहीर - नासा चांद्रमोहीम

या मोहिमेद्वारे चंद्रावर पहिल्यांदाच महिला पाऊल ठेवणार आहे.अर्तिमीस (Artemis) मून लँडींग प्रोग्राम असे या मोहिमेस नाव देण्यात आले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अंतराळवीरांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

नासा चांद्रमोहीम
नासा चांद्रमोहीम
author img

By

Published : Dec 10, 2020, 7:27 PM IST

केप कार्निवल - अमेरिकेच्या अवकाश संशोधन विभागाने (नासा) आगामी चांद्र मोहीमेसाठी अठरा अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहे. 'अर्तिमीस (Artemis) मून लँडींग प्रोग्राम' असे या मोहीमेस नाव देण्यात आले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अंतराळवीरांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

महिला पहिल्यांदाच ठेवणार चंद्रावर पाऊल -

नासा चांद्रमोहीम

चंद्रावर पहिल्यांदाच या मोहिमेद्वारे महिला पाऊल ठेवणार आहे. तर पुरुषही पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे. या अठरा अंतराळवीरांच्या गटातून त्यांची निवड केली जाणार आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. १९६० आणि ७० च्या दशकात अमेरिकेने अपोलो मिशनद्वारे चंद्रावर स्वारी केली होती. आता पुन्हा २०२४ साली चंद्रावर जाण्यासाठी नासा काम तयारी करत आहे.

भविष्यातील हिरो, पेन्स यांचे गौरवोद्गार -

अमेरिकन बंधुंनो, मी तुम्हाला भविष्यातील हिरोंची ओळख करू देतो. जे आपल्याला पुन्हा एकदा चंद्रावर घेवून जातील. हे सर्वजण अर्तिमीस जनरेशनचे आहेत, असे असे गौरवोद्गार अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी काढले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठराविक लोकांच्या उपस्थिती नासाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

२०२४ साली मोहीम

नासाकडे सध्या ४७ अंतराळवीर आहेत. ही संख्या भविष्यात वाढणार असल्याचे नासाचे प्रशासक जीम ब्रीडेनस्टाईन यांनी म्हटले. अमेरिकेने २०२४ साली चांद्रमोहीम राबविण्याची तयारी सरू केली असली तरी ही मोहीम अनिश्चिततेत सापडली आहे. येत्या काळात नासाच्या प्रशासनातही काही बदल होणार आहेत. त्यामुळे त्याचा मोहिमेवर परिणाम होणार असल्याचे बोलेल जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.