वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया देखील येणार आहेत. आपण भारतामध्ये येण्यास उत्सुक असल्याचे मेलेनिया यांनी टि्वट करून म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
-
Thank you @narendramodi for the kind invitation. Looking forward to visiting Ahmedabad & New Dehli later this month. @POTUS & I are excited for the trip & to celebrate the close ties between the #USA & #India. https://t.co/49LzQPiVLf
— Melania Trump (@FLOTUS) February 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you @narendramodi for the kind invitation. Looking forward to visiting Ahmedabad & New Dehli later this month. @POTUS & I are excited for the trip & to celebrate the close ties between the #USA & #India. https://t.co/49LzQPiVLf
— Melania Trump (@FLOTUS) February 12, 2020Thank you @narendramodi for the kind invitation. Looking forward to visiting Ahmedabad & New Dehli later this month. @POTUS & I are excited for the trip & to celebrate the close ties between the #USA & #India. https://t.co/49LzQPiVLf
— Melania Trump (@FLOTUS) February 12, 2020
भारत आपल्या खास पाहुण्यांचे अविस्मरणीय स्वागत करेल. हा दौरा दोन्ही देशांसाठी खास असून भारत आणि अमेरिकादरम्यान असलेले संबंध आणखी मजबूत होतील, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.
अहमदाबादमध्ये होणाऱ्या 'केम छो ट्रम्प' या कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपली पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला साधारणपणे १.२५ लाख लोक उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कार्यक्रमात कित्येक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, ज्यामध्ये शेकडो कलाकार सहभागी असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारत भेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथग्रहण केल्यानंतर तीन वर्षांनी, अखेरीस डोनाल्ड ट्रम्प आता भारताला भेट देणार आहेत. ट्रम्प यांची भारतभेट जगाच्या नजरेत भरण्याच्या दृष्टीने आणि राजकीय रेट्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील.