ETV Bharat / international

कमला हॅरीस यांच्याकडून मूळ भारतीय वंशाच्या सबरीना यांची माध्यम सचिवपदी निवड

author img

By

Published : Aug 17, 2020, 3:15 PM IST

अमेरिकेत पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी माध्यम सचिव म्हणून मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन व्यक्तीची निवड झाली आहे. न्यू जर्सीचे कोरी बुकर आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर माईक ब्लूमबर्ग हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना सबरीना यांनी प्रसिद्धीचे काम केले आहे.

संपादित - कमला हॅरिस
संपादित - कमला हॅरिस

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेच्या लोकप्रतिनिधी (सिनेटर) कमला हॅरीस यांनी मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या सबरीना सिंग यांच्यावर माध्यम सचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक हॅरीस लढवित आहेत. त्यांच्या प्रसिद्धीची धुरा सबरीना यांच्याकडे असणार आहे.

सबरीना सिंग यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोनवेळा डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रसिद्धीचे काम केले आहे. न्यू जर्सीचे कोरी बुकर आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर माईक ब्लूमबर्ग हे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना सबरीना यांनी प्रसिद्धीचे काम केले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या अध्यपदाच्या निवडणुकीत असलेले जो बिडेन यांनी 55 वर्षीय मूळ भारतीय वंशाच्या हॅरीस यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.

सबरीना सिंग यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, की कमला हॅरीस यांच्यासाठी माध्यम सचिव म्हणून सहभागी होताना खूप आनंद होत आहे. काम करून नोव्हेंबरमध्ये विजयी होण्यासाठी वाट पाहू शकत नाही. अमेरिकेत पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी माध्यम सचिव म्हणून मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन व्यक्तीची निवड झाली आहे.

सबरीना सिंग या लॉस एंजिलिसमधील रहिवासी आहेत. त्यांनी डेमॉक्रॅटिकच्या राष्ट्रीय समितीसाठी प्रवक्ता म्हणून काम केले आहे. त्या सरदार जे. जे. सिंग यांच्या नात आहेत. सिंग हे भारतीय-अमेरिकन समुदायासाठी चालविण्यात येणारी इंडिया लीग ऑफ लीग या सेवाभावी संस्थेशी संबंधित आहेत.

दरम्यान, हॅरीस या गतवर्षी अध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना फारशी लोकप्रियता न मिळाल्यामुळे त्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून मागे पडल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.