वॉशिग्टंन - सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांनी कोरोना चाचण्या वाढवल्या तर तिथे आणखी कोरोना प्रकरणे समोर येतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने आतापर्यंत तब्बल वीस दशलक्ष लोकांची कोरोना चाचणी केली आहे.
लक्षात ठेवा जेव्हा आपण अधिक चाचण्या करतो. तेव्हा अधिक कोरोनाग्रस्त प्रकरणे समोर येतात. अमेरिकेमध्ये जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. कारण, येथे सर्वांत जास्त कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जर चीन किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेतल्यास, मी खात्री देतो की, तिथे सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळतील, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या तुलनेत जर्मनीत 40 लाख आणि दक्षिण कोरियाने 30 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. जॉन हॉपकिन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये आतापर्यंत 19 लाख कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 1 लाखापेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये 2 लाख तर चीनमध्ये 84 हजार 177 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार अमेरिकेमध्ये पसरला आहे.