हैदराबाद - जगभरात कोरोनाचे ४२ लाख ८० हजार ९२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर २ लाख ८३ हजार ८६८ रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सुमारे १५ लाख जण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.
बाधित रुग्णांपैकी अनेकांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे जाणवतात. तर वयोवृद्ध आणि आधीच आजारी विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे जाणवत असून रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे. चीनमध्ये नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारने नागरिकांना सुरक्षा बाळगावरून सतर्क केले आहे. १४ नव्याने रुग्ण आढळून आल्याने राष्ट्रीय आरोग्य कमिशनच्या प्रवक्त्या मी फेंग यांनी नागरिकांना सतर्क केले आहे.
अमेरिकेमध्ये सर्वात जास्त १३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 80 हजार जण दगावले आहेत. स्पेन, इंग्लड, रशिया, फ्रान्स, जर्मनीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.
विविध देशांतील कोरोनाची परिस्थिती