फ्लोरिडा - यूकेमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना विषाणूचा रुग्ण सापडल्याची पहिली घटना फ्लोरिडामध्ये शुक्रवारी नोंदविण्यात आली. या नवीन विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडलेले हे अमेरिकेचे तिसरे राज्य आहे.
'फ्लोरिडामधील मार्टिन काउंटीमध्ये यूकेमध्ये आढळलेल्या नवीन कोविड-19 प्रकारातील विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण 20 वर्षीय पुरुष व्यक्ती असून त्याचा प्रवासाचा इतिहास नाही. या प्रकरणी विभाग सीडीसीकडे तपास करत आहे', असे फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने एका ट्विटमध्ये लिहिले आहे.
'यावेळी, कोविड-19 लसीच्या परिणामकारकतेवर फारसा परिणाम होणार नाही, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे,' असे फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा - मध्य-पूर्व आशियामध्ये कोरोनाच्या इंग्लंडमधील स्ट्रेनचा शिरकाव; जॉर्डनमध्ये आढळले दोन रुग्ण
हिलच्या वृत्तानुसार, B.1.1.7 नावाचा नवीन कोविड-19 स्ट्रेन या आठवड्यात प्रथम कोलोरॅडो आणि कॅलिफोर्नियामध्ये सापडला. आरोग्य तज्ज्ञ आणि औषधाच्या कंपन्यांचा हवाला देत हिलने सांगितले की, फायझर आणि मॉडर्ना या लसी नवीन कोरोना विषाणूविरूद्ध प्रभावी असल्याचे मानले जाते. परंतु, त्याच्या कार्यक्षमतेची पुष्टी करण्यासाठी अधिक चाचणी घेण्यात येत आहे.
मात्र, हा कोरोनाचा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. मात्र, याची लक्षणे आधीच्या कोरोना विषाणूच्या तुलनेत जास्त गंभीर जास्त प्राणघातक नसतात, असे म्हटले जात आहे. हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार सर्वप्रथम युनायटेड किंगडममध्ये आढळला.
हेही वाचा - पाकिस्तान चीनच्या सिनोफार्मकडून कोविड -19ची लस खरेदी करणार