ETV Bharat / entertainment

What a coincidence : अनुष्का शर्मा आणि क्रिती सेनॉन एकाच दिवशी झळकल्या रिचर्ड क्विन गाऊनमध्ये - रिचर्ड क्विन गाऊन

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनने एकाच दिवशी सारखा पॅटनचे ड्रेस परिधान केले. योगायोगाने, दोघांनी सारखीच हेअरस्टाइल केली होती.

Anushka Sharma Kriti Sanon
अनुष्का शर्मा आणि क्रिती सॅनन
author img

By

Published : May 27, 2023, 12:25 PM IST

मुंबई: कधीकधी सेलिब्रेटी समान पोशाख घालून एखाद्या कार्यक्रमाला येतात, असे काही घडले अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिती सॅननसोबत. आयफा रॉक्सच्या ग्रीन कार्पेटवर क्रिती सॅनन तर कान्सच्या रेड कार्पेटवर अनुष्का शर्मा एकाच दिवशी सारख्या पॅटनचे ड्रेस घातले होते. मात्र या दोघींच्या ड्रेसचा रंग हा वेगवेगळा होता. अनुष्काने ऑफ-शोल्डर आयव्हरी रिचर्ड क्विन कॉउचर गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. विशेष म्हणजे, त्याच दिवशी, क्रितीने आयफा रॉक्सच्या ग्रीन कार्पेटमध्ये अनुष्का सारखाच ड्रेस परिधान केला होता. योगायोगाने, दोघांनी सारखीच हेअरस्टाइल केली होती. अनुष्का आणि क्रितीने स्लीक केसांच्या अंबाडा घातला होता.

अनुष्काने केले पदार्पण : अनुष्काच्या कान्स पदार्पणाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही परंतु या महिन्याच्या सुरुवातीला, भारतातील फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी एका ट्विटमध्ये ती चित्रपट महोत्सवात असल्याचे उघड केले. 'विराट कोहली आणि अनुष्का शर्माला भेटून आनंद झाला! मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आणि अनुष्काच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या प्रवासाबद्दल मी चर्चा केली,' असे त्यांनी नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासात अनुष्का आणि विराटची भेट घेतल्यानंतर लिहिले आहे.

वर्कफ्रंट : अनुष्का आणि क्रितीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, या अभिनेत्रींकडे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. 'चकडा एक्सप्रेस'मध्ये अनुष्का दिसणार आहे. प्रॉसिट रॉय दिग्दर्शित, 'चकडा एक्सप्रेस' हा माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे, जो केवळ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आली नाही. अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा त्याची होम प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्मझसोबत 'चकडा एक्सप्रेस'ची निर्मिती करणार आहे. तर दुसरीकडे, क्रिती ही प्रभास सोबत 'आदिपुरुष' या चित्रपटात झळकणार आहे. तसेच क्रिती ही शाहिद कपूरसोबत रोमांन्स करताना ‘एन इंपॉसिबल लव स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे. टायगर श्रॉफसोबत ती ‘गणपत’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

हेही वाचा : Cannes 2023 : कान्समध्ये पैसे घेऊन चित्रपट दाखवले जातात, नवाजुद्दीचे धक्कादायक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.