मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या फॅशन सेन्ससाठी खास ओळखली जाते. ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. आता नुकतेच दीपिकाला मुंबई विमानतळावर पापाराझीने स्पॉट केले. यावेळी कॅज्युअल वेअरमध्ये ती दिसायला फार सुंदर दिसत होती. दीपिकाचे विमानतळावरील लूक हे फार मोहक होते. यावेळी तिने पांढर्या टँक टॉप, निळ्या जीन्स आणि बेज ओव्हरसाईज जॅकेट परिधान केले होते. याशिवाय तिने काळ्या रंगाचा सनग्लासेस घातला होता. यावर तिने आकर्षक लुई व्हिटॉन हँडबॅग देखील घेतली होती. तिने तिची हेअरस्टाईल ही पोनीटेल ठेवली होती. यावेळी तिने स्ट्रॅपी ट्रेनर्ससह लूक कॅरी केला होता. या लूकमध्ये दीपिका हटके दिसत होती.
दीपिकाचे हटके लूक : व्हिडिओमध्ये दीपिका प्रवेशद्वाराकडे चालत जाताना दिसत आहे. विमानतळावर उभ्या असलेल्या फोटोग्राफरांनी तिचे अभिवादन केले त्यानंतर तिने त्यांच्याकडे बधून एक छान स्माईल दिली. दीपिकाची खूप जास्त प्रमाणात फॅनफॉलोविंग आहे. ती इंस्टाग्राम फार जास्त सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी इंस्टाग्रामवरून संवाद साधत असते. याशिवाय बरेचदा ती इंस्टाग्राम लाईव्ह देखील करत असते. अनेकदा ती आपले फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यासोबत शेअर करत असते. बऱ्यांचदा ती बॉलिलूडमधील वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये दिसत असते.
वर्कफ्रंट : दीपिकाच्या वर्कफ्रंटवर बोलायचे झाले तर ती सध्या पठाण या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत रूपेरी पडद्यावर झळकली होती. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. पुढे ती 'फायटर' या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनसोबत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे दीपिका आणि ऋतिक पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. तसेच या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटत अभिनय करतांचे तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच ती साय-फाय थ्रिलर चित्रपटामधून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात दीपिका ही प्रभास आणि अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन महानती फेम नाग अश्विन करत आहेत.
हेही वाचा :