ETV Bharat / entertainment

Vivek Agnihotri announces Parva : महाभारतावर तीन चित्रपट बनवण्याचा विवेक अग्निहोत्रींचा निर्धार, 'पर्व' फ्रँचाइजीची केली घोषणा - ख्यातनाम कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा

Vivek Agnihotri announces Parva : ख्यातनाम कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांच्या 'पर्व' कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्धार विवेक अग्निहोत्री यांनी केलाय. पर्व कादंबरीचं कथानक महाभारतावर आधारित आहे. यातील पात्रं आणि प्रसंग मूळ महाभारताहून वेगळे विचार मांडणारे आहेत. त्यामुळे या कथेला अग्निहोत्री कसा न्याय देणार हे पाहावं लागणारेय.

Vivek Agnihotri announces Parva
महाभारतावर तीन चित्रपट बनवण्याचा विवेक अग्निहोत्रींचा निर्धार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 2:09 PM IST

मुंबई - Vivek Agnihotri announces Parva : 'द ताश्कंद फाईल' आणि 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री हे 'पर्व' हा आगामी महत्त्वकांक्षी चित्रपट बनवणार आहे. ख्यातनाम कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांनी लिहिलेल्या 'पर्व' कादंबरीवर आधारित हा चित्रपट असेल. तीन भागामध्ये चित्रपटाची मालिका करण्याचा निश्चय त्यांनी केलाय. विवेक यांनी सोशल मीडियावर 'पर्व' फ्रँचाइजीचे तीन चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलंय. या फ्रंचाइजीची निर्मिती विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी करणार आहे. प्रकाश बालेवाडी 'पर्व' चित्रपटाचं सह लेखक म्हणून काम करत आहेत आणि कादंबरीचे मुळ लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, पद्मश्री एस एल भैरप्पा आहेत.

  • BIG ANNOUNCEMENT:

    Is Mahabharat HISTORY or MYTHOLOGY?

    We, at @i_ambuddha are grateful to the almighty to be presenting Padma Bhushan Dr. SL Bhyrappa’s ‘modern classic’:
    PARVA - AN EPIC TALE OF DHARMA.

    There is a reason why PARVA is called ‘Masterpiece of masterpieces’.

    1/2 pic.twitter.com/BiRyClhT5c

    — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'पर्व' चित्रपटाचं कथानक एस एल भैरप्पा यांच्या कन्नड भाषेतील गाजलेल्या कादंबरीचं रुपांतर असेल. ही कादंबरी संस्कृत भाषेतील महाकाव्य महाभारत ग्रंथावर आधारित आहे. भैरप्पा यांचे कार्य आधुनिक क्लासिक म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या 'पर्व'सह इतर अनेक साहित्याला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी X वर चित्रपटाचा फर्स्ट लुक देखील शेअर केला आहे. थोडक्यात, महाभारत विषयावर आधारित भव्य चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय विवेक अग्निहोत्री यांनी घेतलाय. हे शिवधनुष्य ते कसं पेलणार हे आगामी काळ ठरवणार आहे.

विवेक अग्निहोत्री यांना नुकताच त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडलेल्या या समारंभात 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

समारंभानंतर विवेक यांनी सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त करताना लिहिले होते, या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारासाठी धन्यवाद. 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटासाठी मिळालेला हा पुरस्कार सर्व धार्मिक दहशतवादाला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे. भारतातील सर्व नागरिकांचे आभार. यामध्ये त्यांनी कार्यक्रमातील त्यांच्या परिचयाचा व्हिडिओ देखील शेअर केला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विवेक अग्निहोत्रीनं पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा -

  1. Ganapath & Yaariyan 2 Bo Day 2 : 'गणपथ' आणि 'यारियां 2' चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर थंड कमाई

2. Leo Box Office Collection Day 3: विजय 'थलपथीच्या 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर केलं वादळ निर्माण...

3. Kajol Durga Puja : जुहूच्या सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवात झळकली काजोल, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.