ETV Bharat / entertainment

Vicky Kaushal And Katrina Kaif : कतरिना-विक्कीच्या नात्यात कसा आला लग्नाचा ट्विस्ट, वाचा कसा फुलला नात्याचा गुलाब... - Vicky Kaushal

Vicky Kaushal And Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवरफुल जोडप्यांपैकी एक. या कपलचं ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झालं होतं. एका मुलाखतीत विक्कीनं कॅट आणि त्याच्या रोमँटिक रिलेशनचं गुपित उघड केलं.

Vicky Kaushal And Katrina Kaif
विक्की कौशल आणि कतरिना कैफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:36 PM IST

मुंबई Vicky Kaushal - Katrina Kaif : अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफनं 9 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या थाटामाटात राजस्थानमध्ये लग्न केलं. या लग्नात मीडियाला एंट्री नव्हती. मात्र त्यांच्या लग्नातील अनेक फोटो यादरम्यान व्हायरल झाले होते. लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण त्यांनी त्यांचं नातं दोघांनीही लपवून ठेवलं होतं. यावर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान आता एका मुलाखतीमध्ये विक्की कौशलने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. विक्की अलीकडेच वि आर युवाजच्या 'बी अ मॅन यार'च्या एपिसोडमध्ये दिसला होता. या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल काही खुलासे केले.

विक्की कौशलची मुलाखत : विक्कीने यावेळी कतरिना कैफसोबतच्या नात्याबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. तो म्हणाला की, कतरिना ही त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कतरिना त्याची काळजी घ्यायला लागली होती. त्यानंतर तो कतरिनालाच्या प्रेमात पडला. पुढे विक्कीने सांगितलं की, मला त्या वास्तवाशी जुळवून घेताना त्रास झाला. जेव्हा मी कतरिनाला जवळून ओळखलं, तेव्हा मी प्रेमात पडलो. ती खूप छान व्यक्ती आहे हे मला माहीत आहे. मला सुरुवातीपासूनच वाटायचं की ती माझी पत्नी असावी. मला आधी तिच्याकडून जे अटेंशन मिळत होतं, ते मला विचित्र वाटायचं. कतरिना मला एक अद्भुत व्यक्ती वाटायची आणि आजही वाटते आणि ती तशीच आहे.

कतरिना कैफने विक्कीला डिनरसाठी बोलावले : विक्कीने पुढे सांगितलं की, जेव्हा त्याला कतरिनाचा डिनरसाठी मेसेज आला, तेव्हापासून त्यांचं नातं सुरू झालं. कतरिना त्याला लग्नाला हो म्हणेल याची त्याला खात्री नव्हती, असं विक्कीने सांगितलं. विक्की म्हणाला की त्यांचे प्रेमसंबंध अशा टप्प्यावर पोहोचले नव्हते, जिथे सस्पेन्स असेल. त्याने लग्नासाठी विचारलं तर तिचं उत्तर होय किंवा नाही असेल, असे त्याला वाटत होतं. पुढे त्याने सांगितलं की, कतरिनाला सुरुवातीपासूनच माहीत होतं की ती दोघांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. ती कायमस्वरूपी काहीतरी शोधत होती. त्यावेळी कतरिना ही विक्कीला समजायला लागली होती, असं त्यानं सांगितलं.

विक्की आणि कतरिनाचे वर्क फ्रंट : या जोडप्याच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचा झाला तर कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. तसंच ती 'मेरी ख्रिसमस'मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विजय सेतुपती असेल. तर विक्की कौशल हा 'सॅम बहादूर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो 'डँकी' आणि 'मेरे मेहबूब मेरे सनम'मध्ये झळकेल.

हेही वाचा :

  1. Nayanthara and vignesh shivan : नयनतारा पती विग्नेश शिवनचा संदेश पाहून झाली नाराज....
  2. Dono trailer out: 'दोनो' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित...
  3. Priyanka Chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर पती निक जोनाससोबत शेअर केले खास फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.