ETV Bharat / entertainment

Twinkle khanna on SOTY casting : ट्विंकल खन्नाला 'शाश्वत' स्टुडंट ऑफ द इयर म्हणत करण जोहरनं केलं अभिनंदन - करण जोहरनं केलं ट्विंकल खन्नाचं अभिनंदन

Twinkle khanna on SOTY casting : ट्विंकल खन्नानं गोल्डस्मिथ्स, लंडन विद्यापीठातून क्रिएटिव्ह आणि लाइफ रायटिंगमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर, तिच्या प्रबंधाचा प्रतिष्ठित पॅट कावनाघ पुरस्काराच्या लाँगलिस्टमध्ये समावेश करण्यात आलाय. याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असून पती अक्षयनेही तिचे अभिनंदन करत अभिमान असल्याचं म्हटलंय.

Twinkle khanna on SOTY casting
ट्विंकल खन्ना आणि करण जोहर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 4:42 PM IST

मुंबई - Twinkle khanna on SOTY casting : अभिनेत्री ते लेखिका असा यशस्वी प्रवास केलेली ट्विंकल खन्ना तिनं अलिकडे प्राप्त केलेल्या अकॅडमीक यशामुळे सध्या चर्चेत आली आहे. गोल्डस्मिथ्स, लंडन विद्यापीठातून क्रिएटिव्ह आणि लाइफ रायटिंगमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर, तिच्या प्रबंधाचा प्रतिष्ठित पॅट कावनाघ पुरस्काराच्या लाँगलिस्टमध्ये समावेश करण्यात आलाय. ट्विंकलनं करण जोहरच्या 2012 च्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी ती एक आदर्श निवड असावी, असं गंमतीनं सुचवलंय.

ट्विंकलनं इन्स्टाग्रामवर विद्यापीठाकडून मिळालेल्या संदेशाच्या स्क्रीनशॉटसह स्वतःचा एक फोटो शेअर केलाय. तिच्या पोस्टमध्ये, तिनं कोणत्याही वयात एखाद्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं महत्त्व अधोरेखित केलय. तिच्या फायनल प्रबंधासाठी तिला एक अपवादात्मक सन्मान प्राप्त झाल्याचाही खुलासा तिनं केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे लंडन विद्यापीठाच्या गोल्डस्मिथ्सच्या प्रतिष्ठित पॅट कावनाघ पुरस्कारासाठी तिच्या प्रबंधाची लाँगलिस्ट करण्यात आलीय. एका कमेंटमध्ये तिनं म्हटलं की, तिचा जुना मित्र करण जोहर याने स्टुडंट ऑफ द इयरमध्ये कास्टिंग एरर केली असावी.

'स्टुडंट ऑफ द इयर'चा दिग्दर्शक आणि ट्विंकलचा खास मित्र करण जोहरनं तिला वर्षातील शाश्वत विद्यार्थिनी म्हणून स्वीकारून हार्दिक अभिनंदन केलंय. ट्विंकलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना करणने लिहिले, 'अभिनंदन डार्लिंग, मला तुझा नेहमीच अभिमान वाटतो आणि तू बरोबर आहेस! तू शाश्वत स्टुडंट ऑफ द इयर आहेस.'

ट्विंकलचा पती अक्षय कुमारनं देखील त्याचा अभिमान आणि कौतुक व्यक्त केलंय. ती सर्वोत्कृष्ट आई असल्याची पदवी तो दरवर्षी तिला देत असतो. नीना गुप्तानेही अभिनंदन करणाऱ्यांच्या सूरात सूर मिसळला आहे. अनेक चाहत्यांनी ट्विंकलला शुभ संदेश पाठवले आहेत आणि तिच्या कामगिरीबद्दल कौतुक केलंय.

गेल्या वर्षी ट्विंकल खन्नानं लंडन विद्यापीठातील गोल्डस्मिथ्समध्ये फिक्शन रायटिंगमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. महेनतीनं तिला आता पदव्युत्तर पदवी प्राप्त झालीय. याबद्दल तिचा पती अक्षयनेही अभिमान व्यक्त केलाय. गोल्डस्मिथ्समध्ये तिच्या अभ्यासक्रमादरम्यान, ट्विंकल लंडनमध्ये राहिली होती आणि अधूनमधून युनिव्हर्सिटी लाईफची झलक शेअर करत होती.

हेही वाचा -

1. Koffee With Karan 8 : रणवीरनं सांगितला दीपिकाच्या नैराश्येचा किस्सा, करण जोहरलाही आला होता पॅनिक अटॅक

2. Tejas Box Office Collection Day 2: कंगना रणौत स्टारर 'तेजस' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ...

3. Ananya And Aditya : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटवर झाले स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.