ETV Bharat / entertainment

The Railway Men Trailer release : भोपाळ गॅस दुर्घटनाचा जीवघेणा थरार, 'द रेल्वे मेन'चा ट्रेलर प्रदर्शित - केके मेनन

The Railway Men Trailer release : 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये भोपाळ गॅस दुर्घटना कशी झाली होती, हे दाखविण्यात आलंय. निरपराध नागरिकांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेल्या रेल्वे मेनची ही थरारक कथा आहे.

The Railway Men Trailer release
द रेल्वे मेन ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 2:49 PM IST

मुंबई - The Railway Men Trailer release : आर. माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान स्टारर 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजचा ट्रेलर आज 6 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. 'द रेल्वे मेन' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'द रेल्वे मेन'ची कहाणी भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. या भयंकर आणि वेदनादायक घटनेनं देशभरात घबराट पसरली होती. भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजमध्ये आर. माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान हे खऱ्या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून शेकडो लोकांचे प्राण वाचवले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'द रेल्वे मेन'चा ट्रेलर तुम्हाला हादरवेल : हा ट्रेलर 2.53 मिनिटांचा आहे. या ट्रेलरची सुरुवातीला केके मेनन हा रेल्वे कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर पुढं व्हिडिओमध्ये बाबिल खानची झलक दिसत आहे, जो रेल्वेच्या नोकरीसाठी जात आहे. तर दिव्येंदू हा रेल्वे पोलीस दलातील हवालदाराच्या भूमिकेत दिसत आहे. पुढच्याच क्षणात कारखाण्यामधील गॅस लिक होताना दिसत आहे. त्यानंतर भोपाळ रेल्वे जंक्शनवर धावपळ होताना दिसत आहे. या गॅसमुळं एकामागून एक प्रवासी मरतआहे. यामध्ये लहान मुले, वृद्ध, महिला आणि तरुण यांचा समावेश आहे. या वेब सीरिजमध्ये आर माधवन भोपाळ रेल्वे जंक्शनच्या जीएमच्या भूमिकेत दिसत आहे.

भोपाळ गॅस दुर्घटना : याशिवाय जुही चावला दिल्लीतील एका सरकारी कार्यालयातून काही व्यक्तीसोबत चर्चा करताना दिसतेय. भोपाळ गॅसच्या पीडितांची मदत करण्यात प्रशासनानं हात वर केल्यावर अखेर आर. माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान मिळून या लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी उचलतात. इतर अभिनेत्यांमध्ये मंदिरा बेदी आणि रघुवीर यादव यांसारखे उत्कृष्ट कलाकारही दिसत आहेत. याशिवाय 'संदीप भैया' सनी हिंदुजा या वेब सीरिजमध्ये पत्रकाराची भूमिका साकारत आहे. 2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ गॅस दुर्घटना घडली होती. या वेब सीरिजचं दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले असून ही वेब सीरिज 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Rashmika Mandanna Fake Video Viral : रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल, बिग बींनी केली कारवाईची मागणी

Rubina Dilaik oozes retro vibes : रुबिना दिलैकचं मॅटर्निटी फोटोशूट, अभिनव शुक्लानं केले पोस्ट

Kartik Aaryan : विराट कोहलीच्या शतकानंतर कार्तिक आर्यनचं अनोखं सेलेब्रिशन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.