ETV Bharat / entertainment

‘तमाशा लाईव्ह' मधील 'फड लागलाय' मध्ये 'ब्रेकिंग न्यूज' मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत!

‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीवर चित्रीत ‘फड लागलाय' या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

the new song fad  laglay from tamasha live will be coming soon to entertain the audience
‘तमाशा लाईव्ह' मधील 'फड लागलाय'
author img

By

Published : Jul 13, 2022, 4:37 PM IST

मुंबई - मराठीमध्ये बऱ्याच वर्षांपासून सांगीतिक चित्रपट आलेला नाही आणि ती दूरी दूर करण्यासाठी येतोय संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह‘. संगीत हे अंतर्मनातील भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम समजले जाते. या संगीतातून जर एखादी कथा पुढे जात असेल तर संगीतप्रेमींसाठी ती एक पर्वणीच ठरेल. असाच संगीत नजराणा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव सज्ज झाले आहेत. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'फड लागलाय' असे या गाण्याचे बोल असून 'ब्रेकिंग न्यूज' मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत या गाण्यात पाहायला मिळत आहे. हे गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

गीतकार म्हणून पहिली संधी - या गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणाला,"’तमाशा लाईव्ह' ची सर्वच गाणी उत्तम आहेत आणि मला याचा फार आनंद होत आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली की एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची गाणी मला लिहायला मिळाली. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.''

नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव - ‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीवर चित्रीत ‘फड लागलाय' या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले,"'तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट म्हणजे एक प्रयोग आहे आणि हा प्रयोग संजय जाधव सारखाच दिग्दर्शक यशस्वी करू शकतो. हा चित्रपट कोणा एकाचा नसून या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा आहे. दिग्दर्शक, लेखक, कलाकार, संगीत टीम, नृत्य दिग्दर्शक या प्रत्येकाचीच भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे. आपापल्या क्षेत्रात माहीर असलेले कलावंत यात आहेत आणि हे सगळे एकत्र आल्याने हा एक भव्य चित्रपट बनला आहे. अरविंद जगताप यांचे संवाद त्यात अधिकच भर टाकणारे आहेत. अमितराज आणि पंकज पडघन या दोन्ही नामवंत संगीत दिग्दर्शकांनी एकत्र येऊन 'तमाशा लाईव्ह'मधील गाण्यांना चारचाँद लावले आहेत. ही एक म्युझिकल ट्रीट आहे.''

एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित 'तमाशा लाईव्ह' चे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहेत.

‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.