ETV Bharat / entertainment

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या 'तिरसाट' चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला - Movies based on love

प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं याची थरारक गोष्ट 'तिरसाट' या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला.

मराठी चित्रपट तिरसाट
मराठी चित्रपट तिरसाट
author img

By

Published : May 5, 2022, 5:33 PM IST

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘प्रेम’ हे असतेच. परंतु ते मिळविण्यासाठी प्रत्येकाने केलेल्या प्रयत्नांची व्याप्ती वेगवेगळी असते. तसं म्हटलं तर, आयुष्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. हे प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं याची थरारक गोष्ट 'तिरसाट' या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीजरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे 'तिरसाट' हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं ‘उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं 'तिरसाट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे, तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

‘तिरसाट’ येत्या २० मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - कॅटरिना कैफने साजरा केला आईचा ७० वा वाढदिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.