मुंबई - संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चे टिझर सोशल मीडियावर झळकल्यानंतर टिझरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. तमाशा लाईव्ह म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगितिक मेजवानी आहे. आपली लोककला जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.’’, असे प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ( Akshay Bardapurkar ) म्हणाले.
प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत.
‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 15 जुलैला ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - बोमन इराणी 'मासूम'मधून करणार डिजीटल पदार्पण