मुंबई : चाहत्यांसाठी पुढील वर्ष खूप जबरदस्त असणार आहे, कारण पुढील्या वर्षात अनेक मोठे चित्रपट सिनेमागृहामध्ये दाखल होणार आहेत. या चित्रपटामध्ये आता एक चित्रपट हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा 'फायटर'ही आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक देशभक्तीपर पोस्टर शेअर केले आणि उद्या सकाळी १० वाजता एक मोठा घोषणा होणार असल्याचे सांगितले आहे. सिद्धार्थ आनंदने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कॅप्शनमध्ये लिहले, 'उद्या सकाळी १० वाजता. स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज', असे त्यांनी सांगितले आहे.
-
#SpiritOfFighter
— Hrithik Roshan (@iHrithik) August 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
10 am tomorrow 🇮🇳 pic.twitter.com/kld2c8nOLX
">#SpiritOfFighter
— Hrithik Roshan (@iHrithik) August 14, 2023
10 am tomorrow 🇮🇳 pic.twitter.com/kld2c8nOLX#SpiritOfFighter
— Hrithik Roshan (@iHrithik) August 14, 2023
10 am tomorrow 🇮🇳 pic.twitter.com/kld2c8nOLX
'फायटर' चित्रपटाबद्दल अपडेट : सिद्धार्थसोबत हृतिक रोशन तिसऱ्यांदा चित्रपट करत आहे. या चित्रपटात हृतिक व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'फाइटर' ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र कोविडच्या महामारीमुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. २०१४मध्ये 'बँग बँग' आणि २०१९ मधील 'वॉर' या दोनही अॅक्शन चित्रपटानंतर हृतिक पुन्हा एकदा 'फाइटर' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी येत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन बघायला मिळणार आहे.
वर्कफ्रंट : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक हा ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणीसोबत अॅक्शन थ्रिलर 'वॉर २'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'वॉर'चा सीक्वल आहे. हा चित्रपट यावेळी अयान मुखर्जी दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख अद्याप समोर आली नाही. दुसरीकडे दीपिका 'फायटर' व्यतिरिक्त 'जवान', 'कल्की २८९८ एडी' आणि 'सिंघम ३' मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ती हृतिक रोशनसोबत 'वॉर २' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबाबत देखील काही दिवसात खुलासा होणार आहे.
हेही वाचा :