नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि प्रसिद्ध रॅपर हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या कॅनडामध्ये असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने हनी सिंग याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. हनी सिंगने याबाबत दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे तक्रार केली असून स्वत:सह संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची विनंती केली आहे.
धमकीची व्हाॅईस नोट पोलिसांना दिली : कॅनडामध्ये असलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाच्या नावाने फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे हनी सिंगने सांगितले. त्याने धमकीची व्हॉईस नोटही पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. हनी सिंगच्या वक्तव्याची पडताळणी करण्यासोबतच दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल कॉलची संपूर्ण माहिती गोळा करत आहे. मीडियाशी बोलताना हनी सिंगने सांगितले की, मला सतत धमकीचे कॉल्स आणि व्हॉईस मेसेज येत आहेत. हे कॉल परदेशी क्रमांकावरून आले आहेत. तो म्हणाला की, 'मृत्यूला कोण घाबरत नाही. मला अशी धमकी पहिल्यांदाच मिळाली आहे. मला जनतेने नेहमीच प्रेम दिले आहे'.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येत गोल्डी ब्रारचं नाव : लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर गोल्डी ब्रारचं नाव समोर आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डी ब्रारने लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांसह सिद्धूच्या हत्येचा कट रचला होता. सध्या तो कॅनडामध्ये आहे. एनआयएने याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नैराश्यावर मात करून हनी सिंग इंडस्ट्रीत परतला : हनी सिंग नुकताच नैराश्यातून सावरला आहे. काही काळापूर्वी त्याने इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. त्याने 2005 मध्ये संगीत निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर अनेक सुपरहिट गाणी आणि रॅपने त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागले आणि तो बायपोलर डिसऑर्डरचा बळी ठरला. तो सुमारे 18 महिने अज्ञातवासात होता. मध्यंतरी त्याच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या.
हेही वाचा :