मुंबई : सारा अली खान आज १२ ऑगस्ट रोजी आपला २८वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा तिच्या साधेपणासाठी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा अली खानने 'केदारनाथ' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली, ज्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले. सारा शेवटी 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
सारा धार्मिक स्थळांवर करते प्रार्थना : साराने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आध्यात्मिक स्थळांना भेट द्यायला आवडते. सारा अनेकदा धार्मिक स्थळांवर प्रार्थना करताना दिसते. गुवाहाटीतील कामाख्या मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल मंदिराला तिने भेटी दिल्या होत्या, अनेकदा ती मनाच्या शांतीसाठी वेगवेगळ्या धार्मिक स्थळी जाताना दिसते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'केदारनाथ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट : साराने २०१८ मध्ये 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. चित्रपटरसिकांना पडद्यावरचा तिचा वावर सुखद आणि प्रसन्न वाटला. या चित्रपटात तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसला होता. या चित्रपटात दोघांच्याही अभिनयाचे कौतुक झाले. त्याचबरोबर चाहत्यांना सारा आणि सुशांत जोडीही खूप आवडली होती. याशिवाय साराला त्या वर्षीचा 'केदारनाथ' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री'चा पुरस्कार देखील मिळाला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सिम्बा'चा धमाका : 'केदारनाथ'नंतर सारा त्याच वर्षी रोहित शेट्टीचा 'सिम्बा' मिळाला. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत झळकली होती. रणवीरसोबतही साराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 'सिम्बा' हा त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट तेलुगू चित्रपट 'टेम्पर'चा हा रिमेक होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
साराचा 'लव्ह आज कल' फ्लॉप : २००९ मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आज कल' या चित्रपट प्रेक्षकांची त्यातली गाणी आणि तरुणाईला साद घालणाऱ्या कथानकामुळे डोक्यावर घेतला. हा चित्रपट त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता. आजही या चित्रपटाला खूप 'रिपीट व्हॅल्यू' आहे. या चित्रपटाची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी त्याचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटात दुसरी पिढी म्हणजे सैफची मुलगी सारा प्रमुख भूमिकेत आली आणि तिच्याबरोबर कार्तिक आर्यन होता. या चित्रपटादरम्यान कार्तिक आणि सारा डेट करत असल्याची बरीच चर्चा झाली होती. हे सर्व असूनही चित्रपट मात्र चालला नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
कुली क्रमांक १ : 'लव आज कल' नंतर सारा त्याच वर्षी वरुण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटामध्ये दिसली. हा १९९५चा हिट चित्रपट 'कुली नंबर १' चा रिमेक होता. गोविंदा आणि करिश्माच्या हॉट जोडीने हा चित्रपट एक आयकॉनिक कॉमेडी चित्रपट बनवला. दिग्दर्शक डेव्हिड धवनने या चित्रपटाचा रिमेक बनविला होता. हा चित्रपट 'प्राइम व्हिडिओ'वर प्रसारित करण्यात आला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'अतरंगी रे'मध्ये साराचा 'अतरंगी' अवतार : आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या चित्रपटात सारा ही जबरदस्त भूमिकेत दिसली. या चित्रपटाची कहाणी खूपच 'हटके' होती. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार धनुष आणि अक्षय कुमार हे कलाकार होते. साराचा हा चित्रपट बऱ्यापैकी गाजला.
हेही वाचा :