ETV Bharat / entertainment

Sam Bahadur Teaser Date: विक्की कौशलचा आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'चा टीझर होणार 'या' दिवशी रिलीज... - सॅम बहादूर

Sam Bahadur Teaser Date: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'चा टीझर हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' चित्रपट आता रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Sam Bahadur Teaser Date
सॅम बहादूरची टीझर रिलीज डेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 5:05 PM IST

मुंबई - Sam Bahadur Teaser Date: विक्की कौशल हा सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळे चर्चेत आहे. यापूर्वी त्यानं 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'सरदार उधम' यासारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान आता 'सॅम बहादूर' चित्रपटाबाबत एक मोठं अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाची टीझरची रिलीज डेट समोर आली आहे. 'सॅम बहादूर' चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझर 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझरबाबत अपडेट : मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात विकी कौशल भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विक्की कौशलने 2022मध्ये सोशल मीडियावर 'सॅम बहादूर' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. या चित्रपटामधील विक्कीचे लूक हुबेहूब फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ सारखे करण्यात आले आहे. 'सॅम बहादूर'चा टीझर रिलीज करण्यासाठी निर्मात्यांनी आयसीसी (ICC ) क्रिकेट विश्वचषक 2023 च्या मोठ्या सामन्याचा दिवस निवडला असल्याचं समजत आहे. या सामन्याच्या निमित्तानं 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझर हा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

'सॅम बहादूर'ची टक्कर या चित्रपटाशी होईल : 'सॅम बहादूर' या चित्रपटासोबत रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट हा देखील रिलीज होणार आहे. या दोन्हीही चित्रपटामध्ये चांगली टक्कर बॉक्स ऑफिसवर होणार आहे. 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलशिवाय सान्या मल्होत्रा ​आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समजत आहे.

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल : हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. मार्शल सॅम माणेकशॉ हे 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय लष्कराचे लष्कर प्रमुख होते. यानंतर त्यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली, त्यानंतर ते भारताचे पहिले फील्ड मार्शल बनले. सॅम माणेकशॉ हे सैन्यात सॅम बहादूर म्हणून प्रसिद्ध होते. सॅम माणेकशॉ यांचा जन्म 3 एप्रिल 1917 रोजी झाला असून त्यांचा मृत्यू हा 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन, तामिळनाडू येथे झाला.

हेही वाचा :

  1. Hbd Ss Rajamouli: उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा वाढदिवस ; जाणून घ्या त्यांच्या 'या' गोष्टी...
  2. Tiger 3: ट्रेलर रिलीजच्या आधी सलमान खाननं शेअर केलं अ‍ॅक्शनमोडमधील कतरिना कैफचं सोलो पोस्टर
  3. Dunki Movie : शाहरुख खानचा 'डंकी' सेटवरचा फोटो व्हायरल; पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.