ETV Bharat / entertainment

Tumse Na Ho Payega screening : 'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची हजेरी - पाहा व्हिडिओ - तुमसे ना हो पायेगा स्क्रिनिंग

Tumse Na Ho Payega screening : बॉलिवूडचं नवं कथित लव्हबर्ड्स जोडपं अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर मंगळवारी मुंबईत एकत्र दिसले. कॉमेडी ड्रामा चित्रपट 'तुमसे ना हो पायेगा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ही जोडी स्टाईलमध्ये उपस्थित राहिली होती.

Tumse Na Ho Payega screening
'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 10:00 AM IST

मुंबई - Tumse Na Ho Payega screening : बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे खूप काळापासून एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या चर्चा रंगत असतात. अनेकवेळा ते वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र नजरेस पडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा असलेला वावर पापाराझी आणि चाहत्यांना चकित करुन गेलाय. मंगळवारी ही जोडी पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलीय. दोघेही आगामी 'तुमसे ना हो पायेगा' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. त्यावेळी हे कथित लव्हबर्ड्स सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसलं.

सोशल मीडियावर पापाराझी अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईत पार पडलेल्या 'तुमसे ना हो पायेगा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ही जोडी स्टाईलमध्ये येताना दिसतेय. दोघांनीही हौशी कॅमेरामन्सना वेगवेगळ्या पोज दिल्या. या कार्यक्रमात अनन्या पांडेनं निळ्या जीन्सवर पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. तिने आपले केस मोकळे सोडले होते आणि पांढऱ्या रंगाची बॅगसोबत ठेवली होती. दुसऱ्या बाजूला आदित्य रॉय कपूरने गडद निळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता आणि काळी पँट आणि मॅचिंग स्निकर्स घातलं होतं.

काही दिवसापूर्वी हे जोडपं मुंबईत दिग्दर्शक अमन गिलच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावताना दिसलं होतं. त्यावेळी अनन्यानं पांढऱ्या रंगाचा ट्यूब ड्रेस परिधान केला होता. तर आदित्य काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होता. त्यावेळी त्यांचं एकत्र येणं त्यांच्या कथित रोमान्सची पुष्ठी करणारं होतं. दोघांची केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पसंत पडत आलीय.

अभिषेक सिन्हा दिग्दर्शित 'तुमसे ना हो पायेगा' चित्रपटाची निर्मिती स्टार स्टुडिओसाठी रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी केली आहे. या आगामी कॉमेडी ड्रामा चित्रपटात इश्वाक सिंग, महिमा मकवाना, गौरव पांडे, अमला अक्किनेनी, गुरप्रीत सैनी, करण जोटवानी आणि मेघना मलिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 29 सप्टेंबर रोजी 'तुमसे ना हो पायेगा' हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

1. Parineeti Chopra Raghav Reception : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका झाली लीक...

2. Taapsee Pannu: तापसी पन्नू निर्मित 'धक धक' चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर होणार दाखल...

3. Shantit Kranti Web Series :'शांतीत क्रांती' मालिकेचा ट्रेलर रिलीज... पाहा, तीन मित्रांच्या बॅलचर ट्रीपची धमाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.