ETV Bharat / entertainment

Rana Daggubati : राणा दग्गुबतीने शेअर केले त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'हिरण्यकश्यप'वर रोमांचक अपडेट.... - राणा दग्गुबती

बाहुबली फेम राणा दग्गुबतीने अमर चित्र कथा कॉमिक्सद्वारे प्रेरित त्याच्या ड्रीम प्रोजेक्टवर एक मनोरंजक अपडेट शेअर केली आहे. या प्रोजेक्टसंबंधित त्याने आपली भूमिका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितली आहे.

Rana Daggubati
राणा दग्गुबती
author img

By

Published : Jul 25, 2023, 4:11 PM IST

मुंबई : राणा दग्गुबतीने त्याच्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त भूमिका रूपेरी पडद्यावर साकारल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे भल्लालदेव. या भूमिकेमुळे त्याने एक चांगलीच ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. आता तो त्याच्या चाहत्यांसाठी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. राणाने हिरण्यकश्यप या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा सध्या केली आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामधील त्याचे लूक कसे असणार याची पहिली झलक दाखविण्यात आली आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये एक भयानक आकृती झळकत आहे. लवकरच हा चित्रपट पडद्यावर झळकणार आहे. हिरण्यकश्यपच्या भूमिकेसाठी तो परफेक्ट दिसत आहे.

पोस्टमध्ये काय लिहले : अलीकडेच राणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आगामी प्रोजेक्टची एक झलक शेअर केली, ज्यात राणाला राक्षसी राजा हिरण्यकश्यप म्हणून दाखवले गेले आहे. व्हिडिओ शेअर करताना, राणाच्या मीडिया हाऊस, स्पिरिट मीडियाने लिहिले, 'संयम हा एक गुण आहे, परंतु आम्ही वचन देतो की प्रतीक्षा करणे योग्य असेल! हिरण्यकश्यपची पौराणिक कथा एक स्मरणीय सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. संकल्पना व्हिडिओ लवकरच समोर येत आहे! तुम्ही राक्षस राजाला भेटण्यासाठी तयार आहात का?' , असे या पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंट : ही पोस्ट शेअर होताच या पोस्टवर खूप कमेंट येत आहेत. या पोस्टवर एका वापरकर्त्याने लिहले, 'ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही वाट पाहत आहोत सर (फायर इमोजीसह) तर दुसर्‍या एका वापरकर्त्याने या झलकीवर प्रतिक्रिया देत लिहले, 'मी हिरण्यकश्यपची वाट पाहत आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. तसेच चाहत्यांनी व्हिडिओमधील संगीताचे देखील कौतुक केले आहेत.

राणाची कुठली भूमिका गाजली : राणा वर्षानुवर्षे साऊथच्या चित्रपटामध्ये काम करत आहे. त्याची साऊथ चित्रपटसृष्टीत चांगलीच एक ओळख बनली आहे. राणाने एसएस राजामौली यांच्या बाहुबली चित्रपटात दुसरी प्रमुख भूमिका साकारली होती. बाहुबली चित्रपटात त्याची भूमिका ही नकारात्मक होती, तरीही या पात्राने सर्वांची मने जिंकले होते. त्यानंतरच राणाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले.

हेही वाचा :

  1. Rani kii Prem Kahaani : 'रॉकी और रॉनी...'मध्ये चालणार का करण जोहरची जादु? एकूण स्क्रिन्स, बजेटबद्दल अधिक जाणून घ्या..
  2. Bigg Boss OTT 2 day 38 highlights: धमाकेदार वीकेंडच्या वॉर नंतर सोमवारी 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये अनपेक्षित घडले....
  3. BPBD Box Office Day 25 : 'बाईपण भारी देवा'ची वाटचाल ७५ कोटीकडे, 'वेड'चा विक्रमही मोडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.