ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant : बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत उमराहून मुंबईत परतली; व्हिडिओ झाला व्हायरल... - शर्लिन चोप्रा

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत उमराहून मुंबईत परतली आहे. राखीचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत झाले आहे. त्याचबरोबर आदिल खान दुरानीने ​​शर्लिन चोप्रा आणि राजश्री मोरेसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला.

Rakhi Sawant
राखी सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 6:12 PM IST

Rakhi Sawant : बॉलिवूडची एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत सध्या चर्चेत आहे. राखी नुकतीच उमराह करण्यासाठी मक्का येथे गेली होती. उमराह केल्यानंतर राखी मुंबईत परतली असून विमानतळावर तिचे स्वागत करण्यात आले. राखीला पाहताच पापाराझी तिच्या नावाने ओरडू लागले, त्यानंतर राखीने त्यांना म्हटले, की तिला राखी नाही तर फातिमा म्हणा. राखी सावंत विमानतळाच्या बाहेर येताच एक व्यक्ती तिला हार घालण्यासाठी पुढे आली, मात्र तिने स्वत:ला मागे केले आणि हातात पुष्पहार घेतला. त्यानंतर एका महिलेला गळ्यात हार घातला.

राखीचे नाव फातिमा : राखीला पाहताच सर्वजण तिच्या नावाचा जयघोष करू लागले. राखीने बाहेर येताच म्हटले, ' राखी नाही, फातिमा बोला. यानंतर पापाराझींनी तिला होकार देत फातिमा म्हटले. जेव्हा एका पत्रकाराने राखीला विचारले की, ती कागदपत्रातही तिचे नाव बदलणार आहे का? यावर राखी सांगितले, 'देवाने मला असे बनवले आहे. मी जशी आहे तसाच तो माझ्यावर प्रेम करतो. मी कागदपत्रात माझे नाव बदलावे असे त्याला वाटत नाही. यापूर्वी उमराह करण्यासाठी गेलेल्या राखी सावंतने मक्कातील अनेक व्हिडिओ शेअर केले होते. राखीने मक्कामधून तिचे रडतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले होते, जे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले होते. हा राखीचा पब्लिसिटी स्टंट आहे असे अनेकांनी म्हटले.

आदिलने शर्लिन चोप्रासोबत रक्षाबंधन साजरा केला : राखीने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर राखीने आदिलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर एका महिलेने आदिलवर बलात्काराचा आरोपही केला होता, यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. आता आदिल हा तुरूगांतून सुटला आहे. त्याने देखील राखीवर अनेक आरोप केले आहेत. दुसरीकडे, आदिल खान दुर्रानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आदिल खान शर्लिन चोप्रासोबत रक्षाबंधन साजरा करताना दिसत आहे. रक्षाबंधनच्या या खास प्रसंगी शर्लिनने स्काय ब्लू कलरचा सूटसह पांढऱ्या रंगाचा दुपट्टा घातला आहे. तर आदिलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. आदिलच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राजश्री मोरे आदिलला राखी बांधताना दिसत आहे. पांढऱ्या सूट आणि लाल दुपट्ट्यात राजश्री सुंदर दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Jawan trailer viewers reaction : 'जवान'च्या रोमांचक ट्रेलरवर प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया
  2. Nayanthara Instagram Debut : नयनताराचे इन्स्टाग्रामवर पदार्पण, 'जवा पोस्टसह पोस्ट केला जुळ्या मलांसोबतचा धमाल व्हिडिओ
  3. Sushant Singh Rajput Sister Shweta Singh Kirti : रक्षाबंधनावर सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.