मुंबई - राजकुमार राव हा बॉलिवूडचा सेल्फ मेड अभिनेता आहे. प्रदीर्घ संघर्षानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता राजकुमार आता चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहात उभा आहे. दरम्यान या कलाकाराबाबत बातम्या येत आहेत की, त्याने स्वप्नांची नगरी, मुंबईत आपले स्वप्नातील घर विकत घेतले आहे, हेच स्वप्न घेऊन प्रत्येक धडपडणारा अभिनेता मुंबईत येतो.
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, राजकुमारने मुंबईत एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. अभिनेत्याने हे घर त्याची 'रुही' चित्रपटाची सह-अभिनेत्री जान्हवी कपूरकडून विकत घेतले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हे अपार्टमेंट जुहू मुंबई येथे आहे आणि अभिनेत्याने ते 44 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अभिनेत्याचे नवीन घर 3456 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. त्याच्या घराची प्रति चौरस फूट किंमत 1.27 लाख रुपये आहे, असे सांगितले जात आहे की जान्हवीने 2020 मध्ये हे घर 39 कोटींना विकत घेऊन चर्चेत आली होती.
कधी झाली होती डील - मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी ३१ मार्चला जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्यात घराबाबत डील झाली होती. त्याची नोंदणी 21 जुलै 2022 रोजी झाली. यासाठी राजकुमार यांनी २.१९ कोटी मुद्रांक शुल्क भरले आहे. जान्हवीने 2020 मध्ये या घराच्या मुद्रांक शुल्कासाठी 78 लाख रुपये भरले होते. लोटस आर्य असे या इमारतीचे नाव असून ते प्रसिद्ध निर्माता आणि बिल्डर आनंद पंडित यांचे आहे.
राजकुमारची कमाई - मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार रावची एकूण संपत्ती जवळपास 60 कोटी रुपये आहे. तो महिन्याला ५० लाखांहून अधिक कमावतो. त्याचे वर्षभराचे उत्पन्न 8 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त तो अनेक ब्रँड्सला एंडोर्स करतो, ज्यातून तो खूप कमाई करतो. राजकुमार एका चित्रपटासाठी 5 ते 6 कोटी रुपये घेतो.
राजुकमारचे आगामी चित्रपट - अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास भोज, सेकंड इनिंग, मिस्टर अँड मिसेस माही, गन्स अँड गुलाब्स, श्रीकांत भोलाचा बायोपिक आणि स्वागत है या चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा - Hbd Sonu Nigam: ऐका सोनू निगमच्या आवाजातील सर्वोत्कृष्ट गाणी