ETV Bharat / entertainment

Rajinikanth wishes Ganapath : रजनीकांतनं 'गणपथ'च्या टीमला दिल्या शुभेच्छा, जॅकी श्रॉफनंही मानलं थलैयवाचं आभार - गणपथ रिलीज

Rajinikanth wishes Ganapath : रजनीकांतनं 'गणपथ: ए हिरो इज बॉर्न' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रजनीकांतच्या पोस्टनंतर टायगरनंही त्यांचं आभार मानलंय जॅकी श्रॉफनंही मुलाला आशीर्वाद दिल्याबद्दल थलैयवाला धन्यवाद दिलेत.

Rajinikanth wishes Ganapath
रजनीकांतनं गणपथच्या टीमला दिल्या शुभेच्छा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 2:02 PM IST

Updated : Oct 20, 2023, 2:49 PM IST

मुंबई - Rajinikanth wishes Ganapath : सुपरस्टार रजनीकांतनं टायगर श्रॉफ आणि 'गणपथ: ए हिरो इज बॉर्न' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट आज देशभर प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून 'गणपथ' विषयी प्रेक्षकांच्या उत्तम आणि साकारात्मक प्रतिक्रिया मिळत होत्या.

'गणपथ'च्या रिलीजबद्दल चर्चा सुरू असतानाचा रजनीकांतनं सोशल मीडियावर टायगरसाठी शुभेच्छा संदेश दिला. त्यांनं आपल्या संदेशात लिहिलं, 'टायगर श्रॉफ आणि त्याच्या गणपथचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स यांना चित्रपटाच्या यशासाठी माझ्याकडून खूप हार्दिक शुभेच्छा.' 'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' हा चित्रपट पुजा एंटरटेनमेंटनं सादर केला आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपथ' चित्रपटाची निर्मिती वाशु भगनानी यांच्या 'गुड कंपनी'नं केली आहे. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी संयुक्तपणे हा चित्रपट बनवला आहे.

  • Thallaiva Rajini Sir, thanks for supporting my family... my love and respects to you and your family always, my brother ♥️

    — Jackie Shroff (@bindasbhidu) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रजनीकांत यांनी 'गणपथ'ला शुभेच्छा दिल्यानंतर टायगर श्रॉफनं सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले. 'खूप आदर आणि तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे सर, तुमच्या या प्रोत्साहनासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.' , असं टायगरनं आभारदाखल लिहिलं आहे. टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ हे रजनीकांत यांचे चांगले मित्र आहेत. अलिकडेच रिलीज झालेल्या 'जेलर' चित्रपटात जॅकीनं त्यांच्या खास मित्राची भूमिका साकारली होती. जॅकीनेही मुलाला आशीर्वाद दिल्याबद्दल रजनीकांतचं आभार मानलं आहेत. 'थलैयवा रजनी सर, माझ्या कुटुंबाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद... माझ्या भावा, तुमच्या कुटुंबाबद्दल माझं प्रेम आणि आदर नेहमी राहील', असं जॅकीनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय.

  • Highest respect and loads of love Sir, Thank you so much for your generous words it means the world to us especially me. Thank you so much sir once again lots of love and respect ♥️🙏🏻 https://t.co/ymPmcmOf44

    — Tiger Shroff (@iTIGERSHROFF) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शुक्रवारी 'गणपथ' चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी कौतुक केलं आहे. या चित्रपटातील टायरच्या भूमिकेचं, यातील ॲक्शन सीन्सचं भरभरुन कौतुक केलंय. क्रिती सेनॉनसोबत टायगरच्या ऑन स्क्रिन केमेस्ट्रीवर अनेकांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.

दरम्यान, टायगर श्रॉफ आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामध्ये तो अक्षय कुमार सोबत काम करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त, तो अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खान यांच्यासमवेत रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो एसीपी सत्याची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा -

  1. Priyanka Chopra: मिस वर्ल्ड २००० प्रियांकासोबत कोण आहे ही मुलगी? ...बिग बॉस 17 साठी दिल्या शुभेच्छा

2. Shilpa Shettys Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने केला 'विभक्त' झाल्याचा खळबळजनक खुलासा

3. Tamannaah Bhatia Vijay Varma : विजय वर्माची काळजी घेताना तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल...

Last Updated : Oct 20, 2023, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.