ETV Bharat / entertainment

OMG 2 box office collection day 10: 'ओह माय गॉड २'ने बॉक्स ऑफिसवर पार केला १०० कोटींचा टप्पा...

अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २'ने देशांतर्गत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे. 'ओह माय गॉड २'च्या १० दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी वाचा...

OMG 2
ओह माय गॉड २
author img

By

Published : Aug 21, 2023, 2:26 PM IST

मुंबई : अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' ११ ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज झाला. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'ओह माय गॉड २' ची बॉक्स ऑफिसवर सतत धूम सुरू आहे. 'ओह माय गॉड २' हा चित्रपट 'गदर २'पेक्षा कमी कमाई करत आहे. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. 'ओह माय गॉड २' देशांतर्गत चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटानं दहाव्या दिवशी १०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रविवारी म्हणजेच १०व्या दिवशी १२.०७ कोटीची कमाई केली आहे. रिलीज झाल्यापासून नऊ दिवसांत या चित्रपटानं १०१.६१ कोटीचा व्यवसाय केला होता. त्यानंतर आता दहाव्या दिवशी या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ११४.३१ कोटी झालं आहे.

'ओह माय गॉड २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : या चित्रपटातील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान पंकज त्रिपाठीनं सांगितलं की, हा रोल त्याला अक्षयमुळे मिळाला. यासोबत त्यानं पुढे सांगितलं की, तो अक्षय कुमारचा खूप आदर करतो. 'ओह माय गॉड २' चित्रपटाचा ओपनिंग आकडा १०.२६ कोटी रुपये होता. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 'ओह माय गॉड २'ने ८५.०५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं शुक्रवारी ६.०३ कोटी, शनिवारी १०.५३ कोटी आणि रविवारी १२.७० कोटी कमावले आहे.

चित्रपटाला मिळाले 'ए' सर्टिफिकेट : 'ओह माय गॉड २' मध्ये अक्षय कुमार भगवान शिवाच्या संदेशवाहकाच्या भूमिकेत आहे. तर पंकज त्रिपाठी हा कांती शरण मुद्गल नावाचा भगवान शिवाचा एक निष्ठावान भक्त आहे आणि यामी गौतम वकील आहे. या चित्रपटात लैंगिक शिक्षणाचा विषय मांडला गेला आहे. 'ओह माय गॉड २'चे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. 'ओह माय गॉड २'ला याआधी सेन्सॉर बोर्डाकडून छाननीला सामोरं जावं लागलं होतं. २७ कटनंतर 'ओह माय गॉड २'ला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट मिळाले. या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. Sunny Deols Juhu Bungalow : खासदार सनी देओल यांच्या बंगल्याचा बँक ऑफ इंडियाकडून लिलाव रद्द, काँग्रेसने 'हा' विचारला प्रश्न
  2. Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख झाली फायनल...
  3. Rajinikanth And Akhilesh Yadav : 'जेलर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपरस्टार रजनीकांत पोहोचले यूपीला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.