मुंबई - बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 चा ग्रँड फिनालेची वेळ जवळ येत असताना प्रेक्षक आपापल्या पसंतीच्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. अलीकडेच अभिषेक मल्हान या स्ट्राँग स्पर्धकाशी मैत्री झाल्यामुळे लक्ष वेधलेल्या जिया शंकरला अचानक घरातून बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे टॉप पाच स्पर्धक घरामध्ये राहिले आहेत. शोमधून बाहेर पडल्यानंतर, जियाने अभिषेकबद्दलच्या तिच्या भावना आणि नात्या विषयीची मते व्यक्त केली आहेत.
प्रत्येक बिग बॉस सीझनमध्ये घडणारी प्रेमकथा नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत असते. ओटीटीचा हा दुसरा सीझनही त्याला अपवाद नव्हता. जिया आणि अभिषेक यांच्यातील मैत्रीचे नाते चर्चेचा विषय बनला होता. अभिषेकबद्दल तिच्या भावना काय आहेत याबद्दल विचारले असता, जियाने स्पष्टपणे उत्तर दिले, 'मी बद्दल यापूर्वीही सांगितले आहे - मला त्याच्याबद्दल प्रेम आहे. हे प्रेम किती खोलवर आहे याबद्दल मी अनिश्चित आहे, पण भावना आहेत हे मात्र निश्चित', असे ती म्हणाली.
जियाने त्यांच्या भावना स्पष्ट करताना तिने आपल्याला मिळालेल्या आव्हानाबद्दल सांगितले. ती म्हणाली की यात अनेक घटक कारणीभूत ठरले. तिच्या मते बाहेरुन पडणाऱ्या प्रभावामुळे गोंधळ वाढला. त्यामुळे तिच्या भावनामध्ये स्पष्टता नव्हती. पुढे ती म्हणाली की ती अजूनही अभिषेकबद्दल आपुलकी बाळगून आहे. 'मी खूप रील्स, बरेच व्हिडिओ पाहिले आहेत, परंतु तरीही, मी त्याच्यासाठी असलेले प्रेम सोडण्यास देण्यास तयार नाही,' असे जिया म्हणाली.
जिया आणि अभिषेकमधील आकर्षण गेल्या काही आठवड्यात प्रेक्षकांनी स्पष्टपणे पाहिले आहे. त्यांच्यातले संवाद, एकमेकांबद्दल असलेली सहानुभूती आणि समर्थन लक्ष वेधणारे होते. आता जिया स्पर्धेतून आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांच्यातील हे नाते अभिषेक बाहेर आल्यानंतरही कायम राहते का हे पाहणे रंजक असेल.
बिग बॉस ओटीटीचा दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी १४ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या दिवशी पाच स्पर्धकामधून एका विजेत्याची घोषणा होईल. हा रंगारंग सोहळा अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यात रंगेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. या फिनाले कार्यक्रमासाठी होस्ट सलमान खानसह आयुष्मान खुराना स्टेज शेअर करणार आहे.
हेही वाचा -
१. Iffm 2023 : करण जोहरची बॉलिवूडमध्ये २५ वर्षे, योगदानाबद्दल मेलबोर्न फेस्टीव्हलमध्ये सन्मान
२. Arjun Rampal : अर्जुन रामपालने वयाच्या ५०व्या वर्षात बनवली दमदार बॉडी....
३. Omg 2 Twitter Review : अक्षय कुमारच्या 'ओ माय गॉड २' चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांची मने...