मुंबई - चित्रपटाच्या सेटवर कलाकार त्यांच्या सहकलाकारांशी चांगले वागतातच असे नाही. नंतरच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये भांडण होऊनही प्रेमात पडलेले किंवा जवळचे मित्र राहिलेले बरेच लोक असले तरी, काहींना चित्रपटाच्या सेटवरील सहकाऱ्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतात. अशीच एक घटना नृत्यांगना-अभिनेत्री नोरा फतेही हिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळात घडली होती.
पहिला चित्रपट रोअर - टायगर ऑफ द सबर्बन्स ( Roar: Tigers of the Sundarbans ) च्या सेटवर तिने सह-अभिनेत्याला तिच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल थप्पड मारली होती. या प्रसंगानंतर त्या गोष्टीला खूप विचित्र वळण मिळाले, असे अभिनेत्री नोराने सांगितले. नोरा सह-अभिनेत्याचे नाव न घेता म्हणाली की दुसरा अभिनेता गैरवर्तन करत होता आणि थप्पड मारल्यानंतर त्याने तिची पाठ थोपटली. जेव्हा नोराने बदला घेतला आणि त्याला पुन्हा मारले तेव्हा अभिनेत्याने तिचे केस ओढले. चित्रपटाचे शूटिंग बांगलादेशमध्ये पार पडले होते हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
या विचित्र भांडणाची आठवण करून देताना अभिनेत्री नेरा फतेहीने सांगितले की क्रूला तिच्या बचावासाठी यावे लागले. नोराने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयुष्मान खुराना अॅक्शन हिरोसोबतच्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कपिल शर्मा शोमध्ये तिच्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले. सोनेरी रंगाच्या साडीत अभिनेत्री शोमध्ये खूपच सुंदर गदिसत होती. तिचे सरळ केस तिने मॅचिंग चोकर आणि टॉप्ससह मोकळे सोडले होते. नोरा फेतहीचा त्या भांडणात अभिनेत्यासोबत फिजीकली झटपट झाली होती. अशा परिस्थितही तिने शांत राहून तो प्रसंग निभावला हे ऐकून अर्चना पुरण सिंगलाही धक्का बसला.
नोराचा वाढदिवशी बेली डान्स - अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीने गेल्या महिन्यात ६ फेब्रुवारी रोजी ३१ वा वाढदिवस साजरा केला. नोरा फतेहीने तिच्या बोल्ड व्हिडीओमध्ये तिच्या गर्ल गँगसोबत दुबईमध्ये भरपूर मजा मस्ती केली आहे. नोरा फतेहीने दुबईच्या समुद्रात बोटीवर आपले केस उघडे ठेवून जबरदस्त बेली डान्स केला. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. नोराला बोल्ड आउटफिटमध्ये ठुमके मारताना पाहून तिचे चाहते वेडे झाले होते. नोराच्या लेटेस्ट डान्स व्हिडिओने सोशल मीडियावरील तापमान वाढवण्याचे काम केले होते.
नोरा फतेहीचे आगामी प्रोजेक्ट - तिच्या आगामी चित्रपट आणि प्रकल्पांबद्दल बोलायचे झाले तर, साजिद खान दिग्दर्शित नोरा फतेही '100 टक्के' या चित्रपटात दिसणार आहे. नोरा व्यतिरिक्त या चित्रपटात जॉन अब्राहम, शहनाज गिल आणि रितेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - Sidharth Malhotra : 'अब मैं अकेला नहीं रहा भाई'; जाणून घ्या कोणाला आणि का म्हणाला सिद्धार्थ मल्होत्रा