मुंबई - बॉलिवूडमध्ये असलेल्या काही वाईट गोष्टी अधून मधून चर्चिल्या जात असतात. कास्टिंग काऊचपासून ते लैंगिक शोषणापर्यंतच्या अनेक गोष्टी मीटू चळवळीच्या काळात समोर आल्या होत्या. त्यानंतर इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात काही लोकांनी मोहीमही सुरू केली होती. दरम्यान, २०१८ मध्ये 'दिलबर' या गाजलेल्या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री आणि उत्तम डान्सर नोरा फतेहीने अलिकडेच एका मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने यामध्ये फिल्म इंडस्ट्रीत काही नकारात्मक आणि चुकीच्या गोष्टींचा रहस्यभेद केला आहे. ती जेव्हा इंडस्ट्रीत नवी होती तेव्हा अनेकांनी तिला सल्ले देण्याचा प्रयत्न केला होता. काही खास लोकांना डेटिंग करण्याचा सल्लाही तिला देण्यात आला होता मात्र तिने तसे करण्यास नकार दिला होता.
नोरा फतेहीने मुलाखतीत सांगितले की, 'पीआरसाठी तिला एका अभिनेत्यासोबत डेटिंग करण्याचा तिला सल्ला देण्यात आला. मात्र तिने हा सल्ला धुडकावून लावला. अशा प्रकारच्या सल्ल्यांकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यश हे दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे नाही तर स्वतःच्या कतृत्वावर अवलंबून असते,' म्हणत तिने स्वचःचा अभिमान वाचत असल्याचे सांगितले.
नोरा म्हणाली की, 'लोकांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी मी केल्या नाहीत. आज मी जी काही आहे त्याची अनेक कारणे आहेत. एक म्हणाला की हे गाणे करु नकोस, दुसरा म्हणाला रियालिटी शो करु नकोस. दिलबरच्या यशानंतर एक म्हणाला की आता ठीक आहे, आता मला दुसरे मार्केट उघडण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. मला आंतरराष्ट्रीय काम करयाचे होते तर एकाने म्हटले इथेच कर, बाहेर जाऊ नकोस, तर काहींनी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.'
नोराने पुढे सांगितले की, तिला या प्रतिक्रिया आवडल्या नाहीत म्हणूनच ती पुढे जाऊ शकली. त्यामुळेच ती आंतरराष्ट्रीय गोष्टी करु शकली. गेल्या वर्षी फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्याच्या समारोपाच्या समारंभात नोरा फतेहीने रहमा रियाद, बलकीस आणि मनाल यासारख्या कलाकारांसह लाइट द स्काय या गाण्यावर जोरदार परफॉर्मन्स केला होता.
कामाच्या आघाडीवर नोरा फतेही अमेझॉन मिनी टीव्हीच्या हिप हॉप इंडिया या डान्स रिअॅलिटी शोमध्ये कोरिओग्रफर रेमो डिसूझासह सहभागी होणार आहे. सध्या ती 'मटका' या तेलुगु चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करुणा कुमार दिग्दर्शित 'मटका' फॅन इंडिया रिलीज केला जाणार आहे. तेलुगु भाषेत बनत असलेला हा चित्रपट तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साजिद खान दिग्दर्शत करत असलेल्या '१०० टक्के' या चित्रपटात ती जॉन अब्रहम, शहनाझ गिल व रितेश देशमुखसह झळकणार आहे.
हेही वाचा -
१. Deepika Padukone : दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस फोटोने इंटरनेटवर जाळ, रणवीर सिंगनेही दिली प्रतिक्रिया
२. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर शेअर केले जबरदस्त फोटो