ETV Bharat / entertainment

Sushant Singh Rajput Suicide Case : सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एनसीबीकडून मसुदा आरोपपत्र दाखल - सिनेअभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा ( Sushant Singh Rajput suicide case ) तपास एनसीबीकडून ( Investigation from NCB ) सुरू असताना, आज एनसीबीने 30 हजार पानी मसुदा आरोपत्र न्यायालयात सादर केले. यामध्ये 33 आरोपींची नावे असून, सिनेअभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. आज सर्व आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर होते.

Sushant Singh Rajput suicide case
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
author img

By

Published : Jun 23, 2022, 10:01 AM IST

Updated : Jun 23, 2022, 10:14 AM IST

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी ( Sushant Singh Rajput suicide case ) नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलने आज मसुदा आरोपपत्र विशेष न्यायालयात ( Draft Chargesheet in Court ) सादर केले. आरोपपत्र 33 आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ( Actress and Sushant Girlfriend Riya Chakraborty ) व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. आज हे सर्व आरोपी मुंबई सत्र न्यायालयात न्यायालयासमोर हजर झाले होते.

आरोपपत्र न्यायालयात दाखल : एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात 30 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण 33 आरोपींपैकी अद्याप 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.

मोबाईल व इतर महत्त्वाच्या गोष्टींची चौकशी : गेल्या 2020 मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले होते. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ, आरोपींनी स्वतःहून दिलेली माहिती तांत्रिक पुरावे, उदा. मोबाइल कॉल्स, व्हाॅट्सॲप चॅट, बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन खोलवर तपास करण्यात आला, असे तपास यंत्रणेने सांगितले.

तपासात परदेशी चलनदेखील जप्त : तपासादरम्यान देशी, परदेशी चलन जप्त करण्यात आले आणि संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पर्यावरणाचा विचार करून अंदाजे ५०,००० पानांचे दोषारोपपत्र इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये न्यायालयात सादर करण्यात आले. तपास पुढे सरकल्यावर पुरवणी दोषारोपपत्र सादर करू, असे एनसीबीने सांगितले.

या प्रकरणातील आरोपींची नावे : या चार्टशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांच्यासह एकूण 33 आरोपींची नावे आहे. यामध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण यांचा जबाब आहे. परंतु, आरोपी म्हणून नाव नाही. मात्र धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद, अर्जुन रामपालचा मेव्हणा अजीसीलाओस दिमिटरीटास याचेही नाव आहे

नेमके काय आहे प्रकरण : १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात सुशांतने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. या घटनेनंतर सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? असा वाद सुरू असतानाच ड्रग्जचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात एनसीबीने तपास सुरू केला आणि अनेक ठिकाणी छापे टाकत एनसीबीने ड्रग्ज जप्त केले होते. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटकही करण्यात आली होती.

हेही वाचा : Vijay Babu: मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबू याला बलात्कार केसमध्ये जामीन मंजूर

Last Updated : Jun 23, 2022, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.