हैदराबाद - दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे नयनतारा आणि विघ्नेश शिवन नुकतेच सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. या गुड न्यूजमुळे एकीकडे या जोडप्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली होती, तर दुसरीकडे या जोडप्यावर सरोगसीचे नियम मोडल्याचा आरोप होत होता. यानंतर हे जोडपे चौकशीला सामोरे गेले. आता तामिळनाडू सरकारला तपासाअंती आढळून आले आहे की या जोडप्याने भारतात अस्तित्वात असलेल्या सरोगसीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या टीमचे म्हणणे आहे की या जोडप्याने सरोगसीचे कोणतेही नियम मोडलेले नाहीत. या संदर्भात, तामिळनाडू सरकारने 3 सदस्यांचे पॅनेल तयार केले होते, ज्यांची निवड आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातून करण्यात आली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पॅनलने सादर केला अहवाल - मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅनलने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर बुधवारी आपला अहवाल सरकारला सादर केला. अहवालानुसार, या जोडप्याने सरोगसीचा कोणताही नियम मोडला नाही, मात्र तपासात असे आढळून आले आहे की, जोडप्याला सरोगसीची सुविधा देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल.
मीडिया रिपोर्टनुसार, पॅनेलने सांगितले की, "जेव्हा आम्ही सरोगसी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमशी बोललो, तेव्हा कळले की या जोडप्याच्या कुटुंबाला 2020 मध्ये शिफारस पत्र मिळाले होते, त्यानंतर त्यांनी सरोगसीची प्रक्रिया सुरू केली. मात्र या दाम्पत्याच्या फॅमिली डॉक्टर देशा बाहेर असल्याने पॅनेल चौकशी करु शकले नाही."
जोडप्याने सरोगसीचा नियम मोडला नाही - पॅनेलच्या रिपोर्टनुसार, सरोगेट मदरने नोव्हेंबर 2021 मध्ये या जोडप्यासोबत करार केला होता आणि 2022 मध्ये सरोगेट महिलेच्या गर्भाशयात गर्भ ठेवला होता. ऑक्टोबर 2022 मध्ये सरोगेट महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सरोगसी नियमन कायदा 2021 अंतर्गत भारतात व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, परंतु या जोडप्याची प्रक्रिया बंदी आधीच सुरू झाली होती, ज्यामुळे जोडप्याचे हे पाऊल बेकायदेशीर मानले जात नाही.
हेही वाचा - चाचा चौधरी कॉमिक सिरीजमध्ये दिसणार ‘फोन भूत’