मुंबई -Mouni Roy DELETES fangirl post : 'नागिन' या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेली अभिनेत्री मौनी रॉय हिनं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामधून यशस्वी बॉलीवूड पदार्पण केलं. अलिकडेच ओटीटीवर रिलीज झालेल्या तिने 'गन्स आणि गुलाब' या वेब मालिकेत ती दुल्कर सलमानसोबत झळकली होती. दुल्कर आवडत असल्याचं उघडपणे सांगून तिनं खळबळ उडवून दिली होती. असं असलं तरी तिच्या आणि दुल्करच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करून तिनं त्वरित तिची इनस्टाग्राम पोस्ट डिलीट केलीय.
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या मौनीनं ब्रह्मास्त्रमधील जुनूनच्या भूमिकेतून ठसा उमटवत छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये सहजत प्रवेश केलाय. अलिकडेच तिनं दुलकर सलमानची प्रशंसा करणारी पोस्ट शेअर केली होती. मात्र नंतर तिनं ही पोस्ट काढून टाकली आहे.
इंस्टाग्राम मौनी नियमितपणे तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो, व्हिडिओ, कामाचे आणि सुट्टीचेही अपडेट्स शेअर करत असते. अलीकडील पोस्टमध्ये, तिनं प्रसिद्ध दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेता दुल्कर सलमानसोबत एक फोटो अपलोड केला होता. आपण त्याच्या कामाच्या प्रेमात पडले असल्याचं म्हणत स्वतःला तिनं 'फॅनगर्ल' म्हटलं होतं. यानंतर मौनी आणि दुल्करच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र आता तिनं ही पोस्ट डिलीट केलीय. अचानक तिनं आपली पोस्ट डिलीट कशी काय केली आणि तिचं इतक्या कमी वेळात हृदय परिवर्तन कसं झालं याबद्दल चाहते आश्चर्य व्यक्त करताहेत.
लोकप्रिय टीव्ही मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधील केटी (कृष्णा तुलसी) या भूमिकेमुळे मौनी पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. एकता कपूरच्या 'नागिन' फ्रँचायझीमध्ये सहभाग घेऊन तिनं आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च यश मिळवलंय. तिन साकारलेल्या नागिनच्या भूमिकेला समीक्षक आणि चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळालीय.
मौनी रॉयनं मनोरंजन उद्योगात अनेक मैत्रिणी जोपासल्या आहेत. बॉलिवूडमधील तिची जवळची मैत्रीण फिटनेस प्रेमी अभिनेत्री दिशा पटानी आहे. याव्यतिरिक्त, ती सध्या 'टेम्पटेशन आयलंड' या रिआलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीतील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुल्कर सलमानने तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही छाप पाडली आहे. 'कारवाँ', 'सीता रामम', 'सोलो' आणि अलिकडेच गाजलेल्या त्याचा 'किंग ऑफ कोठा' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे.
हेही वाचा -
2. Ali Mercchant Got Married : अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी केलं लग्न; फोटो व्हायरल