ETV Bharat / entertainment

Mission Raniganj trailer : अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ - परिणीती चोप्रा

Mission Raniganj Trailer : अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. अक्षयबरोबर या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबरला रिलीज होईल.

Mission Raniganj trailer
मिशन राणीगंजचा ट्रेलर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 7:36 PM IST

मुंबई Mission Raniganj Trailer : अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप जबरदस्त आहे. 'मिशन रानीगंज'मध्ये अक्षय कुमार हा जसवंत सिंग गिलची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसवंत सिंग यांनी खाणीत काम-करत अडकलेल्या लोकांचे प्राण कसे वाचवले हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहते ट्रेलरची वाट आतुरतेने पाहात होते. ट्रेलरमधील काही दृश्यं हादरवून टाकणारी आहेत. 'मिशन राणीगंज' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मिशन रानीगंज' ट्रेलर रिलीज : 'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तसंच चित्रपटाचा ट्रेलर सरदार जसवंत सिंग गिल यांच्या शौर्याला समर्पित आहे. 34 वर्षांपूर्वी नोव्हेंबर 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीत एक मोठी दुर्घटना घडली होती, ज्यामुळं संपूर्ण देश हादरला होता. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक कोळसा खाण अपघात होता. या अपघातात अमृतसरचे अभियंता जसवंत सिंग गिल यांनी 65 लोकांना मृत्यूपासून वाचवले होते. 'मिशन रानीगंज - द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट या अपघाताची कहाणी मांडणार आहे.

'मिशन रानीगंज' चित्रपटाची स्टारकास्ट : पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'मिशन राणीगंज' या चित्रपटाची निर्मिती विशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी केली आहेत. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटातील पहिले गाणे 'जलसा 2.0' रिलीज केले होते. या गाण्याला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हे गाणं सतींदर सरताज यांनी लिहिलं आणि गायलं आहे. गाण्यात अक्षय आणि परिणीती हे पंजाबी लूकमध्ये दिसत आहेत. तसंच या गाण्यात हे जोडपे आकर्षक देसी तालावर भांगडा करत आहे. 'मिशन राणीगंज' चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राबरोबर कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन, वरुण बडोला, राजेश शर्मा आणि वीरेंद्र सक्सेना सारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले एकत्र...
  2. Tiger 3: सलमान खान-कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3'चे प्रमोशनल कॅम्पेन होईल सुरू...
  3. Priyanka Chopra's mom Madhu Chopra : रागनितीचं लग्न चुकवण्यामागचं कारण आलं समोर ; प्रियांका चोप्राच्या आईनं केला खुलासा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.