ETV Bharat / entertainment

Malaika Son Arhaan Birthday : मलायका अरोरानं मुलाच्या वाढदिवसाचे फोटो केले शेअर - अरहान खानचा वाढदिवस

Malaika Son Arhaan 21st Birthday : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान 9 नोव्हेंबर रोजी आपला 21 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान या वाढदिवसानिमित्त मलायकानं काही फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

Malaika Son Arhaan 21st Birthday
मलायका मुलगा अरहानचा २१वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 3:20 PM IST

मुंबई - Malaika Son Arhaan 21st Birthday: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान 9 नोव्हेंबर रोजी आपला 21वा वाढदिवस साजरा करत आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घटस्फोट झाल्यानंतर अरहान त्याच्या आईबरोबर राहतो. दरम्यान, मलायकानं गुरुवारी सकाळी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अरहानच्या वाढदिवसांचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर तिनं हृदयस्पर्शी कॅप्शन दिलं आहे. अरहानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन मिडनाईटमध्ये झालं. मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अरहानच्या मागे फिरताना दिसत आहे.

मलायका अरोरानं फोटो केले पोस्ट : मलायका अरोरानं तिच्या पोस्टवर आपल्या मुलासाठी छान शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये, मलायकानं राखाडी सूट परिधान केला आहे. तर दुसरीकडे अरहाननं काळ्या रंगाच्या पोशाखावर टॅन जॅकेट आणि ग्रे कॅप घातली आहे. या लूकमध्ये तो सुंदर दिसत आहे . दुसर्‍या फोटोमध्ये, मलायका मध्यरात्री अरहानचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. फोटोमध्ये अरहान केक कापताना आणि त्यावर ठेवलेल्या मेणबत्त्या विझवताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं की, 'एक इच्छा माग बर्थडे बॉय आज तू 21 वर्षाचा झाला आहे' फोटोमध्ये मलायका आणि अरहान मॅचिंग ब्लॅक आउटफिट्स घातलेले दिसत आहेत. याशिवाय मलायकानं इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरहानच्या लहानपणापासून तर आतापर्यतचे फोटो आहेत.

अरहान खानचा वाढदिवस : पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'माझा मुलगा आज 21 वर्षांचा झाला आहे. माझी इच्छा आहे की तू सर्वोत्तम जीवन जगावं. प्रामाणिक रहा. तुला आवडत असलेल्या लोकांसाठी वेळ काढा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड मुला. आई तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. आईला तुझ्यावर खूप अभिमान आहे'. या पोस्टवर अनेकजण कमेंट करून अरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मलायका आणि अरबाज खान यांनी 2016मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती. अखेर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अरहान सध्या अमेरिकेत शिकत आहे.

हेही वाचा :

  1. The Archies trailer out: झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'चा कर्णमधुर, नेत्रसुखद ट्रेलर प्रदर्शित
  2. Elvish yadav : रेव्ह पार्टी आणि सापाचं विष पुरविल्या प्रकरणी एल्विश यादवची होणार पुन्हा चौकशी
  3. Bigg Boss 17 day 25 : ऐश्वर्या - अंकिताचं भांडण सुरूच, मन्नारा चोप्रानं घेतलं अभिषेक कुमारचं चुंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.