ETV Bharat / entertainment

'चुकीला माफी नाही', दगडी चाळ २ मधील मकरंद देशपांडेचा करारी लूक - New Dagdi Chal 2 poster

दगडी चाळ २ चित्रपटातील अरुण गवळीच्या भूमिकेतील मकरंद देशपांडेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात पुन्हा एकदा डॅडी चुकीला माफी नाही असे म्हणताना दिसणार आहे. यातील डॅडीचा करारी लूक पोस्टरवर दिसत आहे.

दगडी चाळ २ पोस्टर
दगडी चाळ २ पोस्टर
author img

By

Published : Aug 5, 2022, 4:08 PM IST

मुंबई - दगडी चाळ हा मुंबईतील भायखळा येथील एक भाग आहे. तिथे जवळपासच्या कारखाण्यातील कामगार राहायचे. आता ते अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे. ऑक्टोबर २०१५ ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्रपट प्रकाशीत झाला, ज्यामध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे व पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने कमाल केली होती. तब्बल ३७ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता.

अरुण गवळी या वादग्रस्त व्यक्तिमत्वावर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट बनला होता आणि बराच चाललाही होता. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याचा आता सिक्वेल येऊ घातलाय.

दगडी चाळ २ पोस्टर
दगडी चाळ २ पोस्टर

दगडी चाळ २ चित्रपटातील अरुण गवळीच्या भूमिकेतील मकरंद देशपांडेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात पुन्हा एकदा डॅडी चुकीला माफी नाही असे म्हणताना दिसणार आहे. यातील डॅडीचा करारी लूक पोस्टरवर दिसत आहे.

अंकुश चौधरी सूर्याच्या भूमिकेत असलेले एक पोस्टर यापूर्वी रिलीज करण्यात आले होते. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते प्रेक्षकांनी याआधीच पाहिले आहे. 'डॅडी'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलं आहेच.

दगडी चाळ २ पोस्टर
दगडी चाळ २ पोस्टर

मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.

'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे

हेही वाचा - Hbd Genelia : रितेश देशमुखने पत्नीच्या वाढदिवसानिमित्य पोस्ट केला धमाल व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.