मुंबई - सुपरस्टार महेश बाबू हा आपल्या कुटुंबातील सदस्यांवर भरपूर प्रेम करतो आणि त्यांच्यासोबत सदानकदा सुट्टीसाठी वेळ काढतो, ही गोष्ट काही त्याच्या चाहत्यांपासून लपून राहिलेली नाही. तो कुटुंबासह सुंदर ठिकाणांवर सहल करण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. गेल्या मे महिन्यात स्पेनमध्ये एन्जॉय केल्यानंतर तो आता अज्ञातस्थळी सहलीसाठी रवाना झाला आहे. शनिवारी सकाळी महेश बाबू पत्नी नम्रता शिरोडकर, मुलगा गौतम आणि मुलगी सितारा घट्टमनेनी यांच्यासोबत हैदराबाद विमानतळावर प्रवासाला जाण्यापूर्वी दिसला.
-
Superstar #MaheshBabu with family off to vacation #GunturKaaram @urstrulyMahesh pic.twitter.com/srs35m2Hoh
— 𝙎𝙎𝙈𝘽 𝙁𝙍𝙀𝘼𝙆𝙎 𝙁𝘾 (@ssmb_freaks) July 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Superstar #MaheshBabu with family off to vacation #GunturKaaram @urstrulyMahesh pic.twitter.com/srs35m2Hoh
— 𝙎𝙎𝙈𝘽 𝙁𝙍𝙀𝘼𝙆𝙎 𝙁𝘾 (@ssmb_freaks) July 22, 2023Superstar #MaheshBabu with family off to vacation #GunturKaaram @urstrulyMahesh pic.twitter.com/srs35m2Hoh
— 𝙎𝙎𝙈𝘽 𝙁𝙍𝙀𝘼𝙆𝙎 𝙁𝘾 (@ssmb_freaks) July 22, 2023
प्रवासासाठी महेश बाबूने गुलाबी रंगाची हुडीसह पांढरी ट्राऊजर्स परिधान केली होती आणि नेहमीसारखाच तो स्टायलिश दिसत होता. डोळ्यावर सनग्लासेस घालून त्याने आपला लूक पूर्ण केला होता. दुसऱ्याबाजूला नम्रताने पांढरा कॅज्युअल ड्रेस आणि तपकीरी जॅकेट घातले होते. फ्लाइटच्या बोर्डीगसाठी जात असताना गौतम आणि सितारा एकमेकांशी बोलत घाईने जाताना दिसले.
महेश बाबूच्या या सुट्टीचे कारण मुलगी सिताराचा ११ वा वाढदिवसाचे सेलेब्रिशन असल्याचे सांगितले जाते. २० जुलै रोजी सिताराचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने घरी साजरा करण्यात आला. यावेळी काही सायकल्सचे वाटप गरजू मुलींना करण्यात आले. यासाठी या सामान्य वस्तीतील मुली त्यांच्या आलिशान घरात आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णणिय असाच होता. सर्व मुलींसोबत सिताराने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. महेश बाबू आणि नम्रताने आपल्या कामातून थोडी विश्रांती घेत मुलांसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी क्वालिटी टाईम काढला आहे.
सिताराच्या वाढदिवसाचे आणखी वैशिष्ठ्य म्हणजे तिला मिळालेली जाहिरातीची मोठी ऑफर. हैदराबाद स्थित एका ज्वेलरी कंपनीने जाहिरातीसाठी सिताराची निवड केली आणि एका अप्रतिम जाहिरातीत ती झळकली. विशेष म्हणजे यात ती प्रिन्सेस बनली असून तिची ही अॅड न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमधील बिल बोर्डवर झळकली आहे. हा तिच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतक्या कमी वयात लाभलेला मोठा सन्मान आहे.
महेश बाबू सध्या विक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'गुंटूर कारम' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे शुटिंग स्क्रिप्टमधील काही बदलासाठी थांबवण्यात आले आहे. महेश बाबूने अलिकडेच पूजा हेगडेसोबतच्या एका चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिनाक्षा चौधरी करत आहेत.
हेही वाचा -
१. Sara Ali Khan : सारा अली खानची अमरनाथ यात्रा, पाहा व्हिडिओ
३. Oppenheimer : 'ओपेनहायमर'च्या शोला बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी, कपूर धवन चौकडीने पाहिला सिनेमा