ETV Bharat / entertainment

Thalapathy Vijay : 'लिओ'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद... मात्र, रिलीजबाबत हायकोर्टात सुनावणी... - लिओ चित्रपट

Thalapathy Vijay : विजय-स्टारर 'लिओ'च प्रदर्शनावर मद्रास हायकोर्टात विशेष याचिकेवर सुनावणी होणार आहे. असे असले तरीही हा चित्रपट सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम रचत आहे.

Thalapathy Vijay
थलपथी विजय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 2:08 PM IST

मुंबई - Thalapathy Vijay : थलपथी विजय त्याच्या 'लिओ' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. जगभरात सध्या त्याच्या चित्रपटाचा क्रेझ प्रचंड आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलपथी विजयनं शाहरुख खानचा रेकॉर्ड रुपेरी पडद्यावर मोडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज आहे. काही दिवसांपूर्वीच देशांतर्गत या चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती. 'लिओ' यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटानं चांगलीच कमाई केली आहे.

थलपती विजयाने मोडल शाहरुखचा विक्रम ? : अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटांचे यूकेमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन होते. शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाला सर्वाधिक ओपनिंग यूकेमध्ये मिळाली होती. 'पठाण'नं रिलीजपूर्वी 3 कोटी 22 लाखांची कमाई केली होती. 'Leo' ने पहिल्या दिवशी आतापर्यंत 3 कोटी 23 लाखांची कमाई केली आहे. यूएसए मध्ये या चित्रपटाला 2D ते XD ते आयमॅक्स आणि आरपीएक्स पर्यंतच्या फॉरमॅटमध्ये रिलीज केला जाणार आहे. 'लिओ' हा चित्रपट चांगलाच बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. या चित्रपटात विजय आणि संजय दत्तची मुख्य भूमिका आहेत. याशिवाय त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान हे देखील कलाकार या चित्रपटामध्ये असणार आहेत.

मद्रास उच्च न्यायालय : तामिळ सुपरस्टार विजयच्या 'लिओ' चित्रपटाची निर्मिती केली असलेल्या सेव्हन स्क्रीन स्टुडिओनं दाखल केलेल्या याचिकेवर आज मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांची मागणी आहे की, तामिळनाडू सरकारनं चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता विशेष प्रदर्शनाची परवानगी द्यावी. या याचिकेवर आता सध्या विचार सुरू आहे. विजयचा खूप मोठा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर अवघ्या दहा दिवसांत 51 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 'जवान' आणि पठाणचं कमाईच्याबाबतीत रेकॉर्ड मोडल असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss 17 day 1 highlights: विकी जैनवर टीका झाल्यानं अंकिता लोखंडे बिथरली, मन्नारा चोप्राला सापडला नवा दोस्त
  2. Parineeti Chopra Pictures : परिणीती चोप्रा लग्नानंतर गर्ल्सट्रिपवर ; फोटो झाले व्हायरल...
  3. Hema Malini 75th birthday : हेमा मालिनींच्या 75 व्या वाढदिवसाला सेलेब्रिटी स्टार्सची मांदियाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.