ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार, शाहरुख खानसह अजय देवगण अडचणीत, 'या' प्रकरणात लखनौ उच्च न्यायालयानं बजावली नोटीस

Akshay Kumar Shahrukh Khan and Ajay Devgan : लखनौ उच्च न्यायालयानं चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल जाणून घेऊया.

Akshay Kumar Shahrukh Khan and Ajay Devgan
अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 11:20 AM IST

Updated : Dec 10, 2023, 12:52 PM IST

मुंबई - Akshay Kumar Shahrukh Khan and Ajay Devgan : गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान उच्च न्यायालयानं पुढील कारवाईचा तपशील मागवला आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 9 मे 2024 ही तारीख निश्चित केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) 20 ऑक्टोबर रोजी शाहरुख खान, अक्षय कुमार यांच्यावर तंबाखू कंपन्यांची जाहिरात केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन दिलं : गुटखा जाहिराती विरोधात वकील मोतीलाल यादव यांनी याचिका दाखल केली होती. गुटखा हे मोठ्या प्रमाणावर जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे भारत सरकारच्या पद्म पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या गुटख्याच्या प्रचारात कथित सहभागाचे मुद्दे उपस्थित केले होते. न्यायालयानं ऑगस्ट 2023 मध्ये कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना नोटिसाही बजावल्या होत्या. यात सप्टेंबर 2022 च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यामध्ये याचिकाकर्त्याला शुल्क आकारण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी केंद्र सरकारच्या वतीनं 16 ऑक्टोबरच्या नोटीसची प्रत सादर करत अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावली आहे.

पान मसाला ब्रँडला कायदेशीर नोटीस बजावली : अभिनेते अमिताभ बच्चन यांचा करार संपुष्टात आला असतानाही त्यांना जाहिरातीत दाखवल्याबद्दल संबंधित पान मसाला ब्रँडला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठानं यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. यावेळी अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगणवर कारवाई केली पाहिजे, असा युक्तिवाद करण्यात आला होता. याशिवाय उच्च पुरस्कार देण्यात आलेले मान्यवर देखील गुटखा कंपन्यांसाठी जाहिरात काम करतात, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला.

  • पान मसाला ब्रँडची जाहिरात : अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण हे एक पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीत दिसले. त्यानंतर गुटखा कंपन्यांना प्रोत्साहन देत असल्याचा वाद निर्माण झाला होता. या जाहिरातवरून अनेकांनी या कलाकारांना ट्रोल देखील केलं होतं.

हेही वाचा :

  1. अश्वत्थामाची भूमिका साकारणार शाहिद कपूर, विकी कौशलचा पत्ता कट
  2. विकी कौशलनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त केला शेअर व्हिडिओ
  3. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'चा जगभर डंका, पाहा किती केली कमाई

Last Updated : Dec 10, 2023, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.