कोची (केरळ) - Lokesh Kanagaraj injured : थलपथी विजय 'लिओ' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाची दक्षिणेतील सर्वच राज्यात मोठी क्रेझ निर्माण झालीय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम केरळच्या दौऱ्यावर असताना एक अप्रिय घटना घडली आहे. केरळमधील पलक्कड येथील अरोमा थिएटरला लिओचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी भेट दिली. तेव्हा त्यांना भेटण्याशी मोठा समुदार त्यांच्या दिशेनं आला, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत लोकेश कनागराज जखमी झाले आहेत.
हा अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे लिओची टीम खूप धास्तावली आहे. दिग्दर्शक लोकेश कनागराज, यांच्या पायाला पायाला दुखापत झाली. दुखापतीनंतर, लोकेशने थ्रिसूर रागम थिएटर आणि कोची कविता थिएटरला दिवसभरासाठी नियोजित थिएटर भेटी रद्द करण्यात आल्या. तसेच कोची येथे आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आलीय.
-
Thank you Kerala for your love.. Overwhelmed, happy and grateful to see you all in Palakkad. ❤️
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Due to a small injury in the crowd, I couldn’t make it to the other two venues and the press meeting. I would certainly come back to meet you all in Kerala again soon. Till then… pic.twitter.com/JGrrJ6D1r3
">Thank you Kerala for your love.. Overwhelmed, happy and grateful to see you all in Palakkad. ❤️
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) October 24, 2023
Due to a small injury in the crowd, I couldn’t make it to the other two venues and the press meeting. I would certainly come back to meet you all in Kerala again soon. Till then… pic.twitter.com/JGrrJ6D1r3Thank you Kerala for your love.. Overwhelmed, happy and grateful to see you all in Palakkad. ❤️
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) October 24, 2023
Due to a small injury in the crowd, I couldn’t make it to the other two venues and the press meeting. I would certainly come back to meet you all in Kerala again soon. Till then… pic.twitter.com/JGrrJ6D1r3
लोकेश कनागराज दिग्दर्शित 'लिओ' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देशभरात खळबळ माजवलीय. केरळमध्येही चित्रपटाची कामगिरी अपवादात्मक राहिली असून, अवघ्या पाच दिवसांत 'लिओ'नं २५ कोटी रुपयांची कमाई केली. केरळमधील चाहत्यांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल लोकेश कनागराजने २४ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांना भेट देण्याचं ठरवलं होतं.
-
#Lokeshkanagaraj at Palakkad Aroma Theatre for #LEO success celebration..💥 That Reception from Kerala fans is..🔥👌pic.twitter.com/8wz1L59Ziz
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Lokeshkanagaraj at Palakkad Aroma Theatre for #LEO success celebration..💥 That Reception from Kerala fans is..🔥👌pic.twitter.com/8wz1L59Ziz
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023#Lokeshkanagaraj at Palakkad Aroma Theatre for #LEO success celebration..💥 That Reception from Kerala fans is..🔥👌pic.twitter.com/8wz1L59Ziz
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, दिग्दर्शक लोकेश कनागराजनं केरळच्या लोकांचे आभार व्यक्त केले आणि लवकरच त्यांना भेटण्यासाठी परत येणार असल्याचं कळवलंय. जमावाच्या उत्साहादरम्यान झालेल्या किरकोळ दुखापतीचाही त्यानं उल्लेख केला, ज्यामुळे तो इतर ठिकाणी आणि पत्रकार सभेला उपस्थित राहू शकलो नसल्याचं लिहिलं आहे. केरळमधील पलक्कड येथील एका चित्रपटगृहात चाहत्यांसोबतचा एक फोटोही लोकेश कनागराजने आपल्या मेसेज दरम्यान पोस्ट केलाय.
-
#LEO - Sneak Peek is Releasing Today..🔥#LokeshKanagaraj visit videos to kerala shows the unconditional love of chetans..😲 And that Injury video..😕 Get well soon.. 🤝Imagine the situation if #ThalapathyVijay visited there..💥 pic.twitter.com/bcZ3I9c53b
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#LEO - Sneak Peek is Releasing Today..🔥#LokeshKanagaraj visit videos to kerala shows the unconditional love of chetans..😲 And that Injury video..😕 Get well soon.. 🤝Imagine the situation if #ThalapathyVijay visited there..💥 pic.twitter.com/bcZ3I9c53b
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023#LEO - Sneak Peek is Releasing Today..🔥#LokeshKanagaraj visit videos to kerala shows the unconditional love of chetans..😲 And that Injury video..😕 Get well soon.. 🤝Imagine the situation if #ThalapathyVijay visited there..💥 pic.twitter.com/bcZ3I9c53b
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) October 24, 2023
दरम्यान, 'लिओ'ने बॉक्स ऑफिसवर आधिराज्य गाजवणे सुरूच ठेवलं असून लवकरच बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. तर जागतिक स्तरावरही या ऍक्शन थ्रिलरने 450 कोटींचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य ठेवलंय. 19 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या लिओ चित्रपटानं 2021 मध्ये 'मास्टर' हा गाजलेला चित्रपट रिलीज केल्यानंतर लोकेशचे विजयसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे.
हेही वाचा -