मुंबई - टीव्ही आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तो व्यायाम करताना ट्रेडमिलवरून पडला होता. त्यानंतर गेली ४३ दिवस त्याच्यावर उपचार सुरू असताना एम्समध्ये त्याने २१ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
![राजू श्रीवास्तव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/raju_2109newsroom_1663748428_445.jpg)
राजू यांना राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये वर्कआऊट करताना राजूला ह्रदयविकाराचा झटका आला. तो ट्रेडमिलवरून पडल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अलीकडेच अशाच प्रकारे अनेक सिनेक्षेत्रातील व क्रिडाक्षेत्रातील सेलेब्रिटींना ह्रदयविकाराचा समाना करावा लागला होता.
![पुनीत राजकुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16432220_451_16432220_1663749061696.png)
पुनीत राजकुमारलाही जिममध्ये हृदयविकाराचा झटका - प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे २९ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या वृत्तानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनीत राजकुमारला सकाळी साडेअकरा वाजता जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तातडीने बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच अशाच प्रकारे बॉलिवूडचा तरुण अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचाही लहान वयात हृदयविकाराने मृत्यू झाला.
![दीपेश भान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ddd_2109newsroom_1663748428_1065.jpg)
अभिनेता दीपेश भान यांचं क्रिकेट खेळताना निधन - घराघरात लोकप्रिय टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर हैं'मध्ये 'मलखान'ची भूमिका साकारणारा 41 वर्षीय अभिनेता दीपेश भान यांचं निधन झाले. मीडियानुसार, दीपेश मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक बेशुद्ध पडला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या बातमीमुळे संपूर्ण अभिनय विश्वात दुःखाची लाट पसरली व हळहळ व्यक्त केली गेली.
![सिध्दार्थ शुक्ला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16432220_sidh.jpg)
फिटनेस फ्रिक सिद्धार्थ शुक्लाचे निधन - बिग बॉस आणि बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्या वर्षी २०२१ मध्ये निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या अप्रतिम शरीरयष्टीबद्दल प्रसिद्ध होता. फिटनेस फ्रिक म्हणून तो ओळखला जायचा. त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना तो फिटनेस बाबत जागरूक करीत असे आणि शरीरावर मेहनत करण्यासाठी उद्युक्त करीत असे. बिग बॉसमध्ये तो खूप रागीट असल्याचे दिसले होते. परंतु खऱ्या जीवनात तो अत्यंत मृदुभाषी होता आणि आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवत ठेवायचा.
![टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/tig_2109newsroom_1663748428_179.jpg)
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया यांचेही हृदयविकाराने निधन - सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि टायगर श्रॉफचे मार्गदर्शक कैजाद कपाडिया यांचे यांचे १४ ऑक्टोबर २०२१ रोजी हृदयविकारामुळे निधन झाले. टायगरच्या फिटनेस जडणघडणीत कैजाद यांचा मोठा वाटा होता. मुंबईतील के ११ अकॅडमी ऑफ फिटनेस सायन्सेसचे कैजाद कपाडिया हे मालक होते. त्यांच्या फिटनेस सेंटरवर शरीरसौष्ठवासोबतच चपळतेचे, साहसाचे, संतुलित आहाराचे घडे दिले जायचे. याचा मोठा लाभ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्यांना होत आला आहे. त्यामुळे त्यांच्या जिममध्ये मेहनत करणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या निधनाने धक्का बसला.
हेही वाचा - Raju Srivastava Death: गजोदर भैय्यासाठी शोक व्यक्त करताहेत सेलेब्रिटी