मुंबई - Liberation Struggle of Marathwada : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात १३ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे नाट्यमय माहितीपटाचे खास स्क्रिनिंग होणार आहे. निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्यमय माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती असलेला हा चित्रपट रसिकांसाठी एक पर्वणी ठरु शकतो.
![Liberation Struggle of Marathwada](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-01-2024/20483935_nana.jpg)
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या `मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' या नाट्य माहितीपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केली आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारल्या आहेत.
![Liberation Struggle of Marathwada](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-01-2024/20483935_pushpajpg123.jpg)
सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.
![Liberation Struggle of Marathwada](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-01-2024/20483935_pushpa.jpg)
आशियाई फिल्म फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा १२ ते १८ जानेवारी या काळात थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलाय. यंदा या महोत्सवाचे २० वे वर्ष असून या महोत्सवात निवडलेले चित्रपट मुंबईतील माहीम परिसरातील सिटीलाइट सिनेमा आणि कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात दाखवण्यात येणार आहेत. या महोत्सवाट्या आशियाई विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका या देशातील १२ चित्रपटांचा समावेश असणार आहे. तर, इराणमधील सात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि त्यातही मराठी चित्रपटांची असलेली स्पर्धा यावर्षी महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.
हेही वाचा -