मुंबई - दिग्दर्शक करण जोहरला बॉलिवूडचा 'जॅक ऑफ ऑल' देखील म्हटले जाते. करण बॉलीवूडमध्ये केवळ त्याला चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या ड्रेसिंग स्टाइल, अँकरिंग आणि अप्रतिम सामान्य ज्ञानासाठी देखील ओळखले जाते. मोठे स्टार्स करणसमोर बोलण्यापूर्वी दहादा विचार करतात. त्याचबरोबर करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' या सेलेब्स टॉक शोमध्ये अनेक सेलिब्रिटींना पाणीही पाजले आहे. आता करण जोहरने त्याच्या लोकप्रिय टॉक शोच्या सातव्या सीझनची स्ट्रीमिंग तारीख जाहीर केली आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर ७ जुलैपासून प्रसारित होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे... ज्यामध्ये त्याच्या लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करणच्या गेल्या 18 वर्षांच्या सर्व 6 सीझनची छोटी झलक पाहायला मिळत आहे. त्याच बरोबर हा व्हिडिओ तिन्ही खानांच्या स्पॉट रिस्पॉन्सपासून ते नवीन कलाकारांच्या धमाल-मस्तीपर्यंत अतिशय मजेशीर पद्धतीने तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत करण जोहरने हा शो मोठा आणि हॉट होणार असल्याचे सूचित केले आहे.
करण जोहरची मागील पोस्ट - वास्तविक, करण जोहरने या शोचा पुढचा सीझन यापुढे येणार नसल्याचे सोशल मीडियावर उघडपणे जाहीर केले होते. याआधी बातमी आली होती की या शोचा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटमेंट जारी करत लिहिले की, 'हॅलो, कॉफी विथ करण गेल्या सहा सीझनपासून तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मला असे वाटते की मी पॉप संस्कृतीच्या इतिहासात माझ्यासाठी एक लहान स्थान कोरले आहे. तसेच, मी तुम्हाला जड अंतःकरणाने सांगत आहे की आता कॉफी विथ करणचा नवीन सीझन येत नाही.
करणच्या या विधानामुळे प्रेक्षक हताश आणि नाराज झाले होते. मात्र करणची ही एक ट्रीक होती. हा शो आता टीव्हीवर नाही तर ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे त्याने नंतर स्पष्ट केले.
'कॉफी विथ करण' - करण जोहरने दुसर्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले होते की हा शो थांबलेला नाही आणि आता स्टार वर्ल्ड ऐवजी डिस्ने + हॉटस्टारवर प्रवाहित होईल. वास्तविक, कोणत्याही गोष्टीचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग कसे करायचे ही गुणवत्ता करणमध्ये ठासून भरलेली आहे. असे करून करण जोहरने त्याचा शो 'कॉफी विथ करण-सीझन 7' एका दिवसात पुन्हा चर्चेत होता.
करण जोहरचा हा लोकप्रिय टॉक शो स्टार वर्ल्ड वाहिनीवर प्रसारित होत होता. या शोमध्ये अनेक सेलेब्स समोर आले, तर अनेकांनी त्यांच्या लव्ह लाईफशी संबंधित किस्से उघडपणे सांगितले होते.
हेही वाचा - 'शमशेरा'चा ट्रेलर लॉन्च प्लॅन उघड, रणबीर कपूर प्रमोशनसाठी सज्ज