ETV Bharat / entertainment

'कांतारा 2'साठी नव्या कलाकारांचा शोध सुरू, ऑडिशनमधून होणार निवड

Kantara Auditions for Actors : 'कांतारा' या चित्रपटाचा प्रीक्वल लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, 'कांतारा 2'साठी नवीन कलाकारांना चांगली संधी मिळणार आहे. या चित्रपटासाठी सध्या ऑडिशन सुरू आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 5:22 PM IST

Kantara Auditions for Actors
कांतारा ऑडिशन

मुंबई - Kantara Auditions for Actors : कन्नड चित्रपटांच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट असलेला 'कांतारा' हा चित्रपट अनेकांचा आवडता बनला होता. दरम्यान या चित्रपटाचा प्रीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. आता 'कांतारा'च्या प्रीक्वलवर काम सुरू आहे. 'कांतारा 2' चित्रपसाठी निर्माते नवीन कलाकारांना संधी देणार आहेत. ज्यांना अभिनयाची आवड आणि चित्रपटामध्ये काम करण्याची संधी पाहिजे आहे, असं कलाकार या ऑडिशनला जाऊ शकतात.

'कांतारा' प्रीक्वलसाठी अर्ज कसा करायचा : 'कांतारा'ची निर्मीती होंबळे फिल्म्स करत आहे. या निर्मिती संस्थेनं आज 12 डिसेंबरला घोषणा केली की, त्‍यांना चित्रपटासाठी काही स्टारकास्‍टची गरज आहे. 'कांतारा'च्या ऑडिशनसाठी निर्मात्यांनी पुरुषांसाठी 30 ते 60 वर्षे आणि महिलांसाठी 18 ते 60 वर्षे वय निश्चित केले आहे. ''जर तुम्हाला अभिनयाची आवड असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर चित्रपटात काम करण्याची संधी मिळवायची असेल तर तुमची प्रोफाइल 'कांतारा' फिल्म्स साईडवर अपलोड करा. 'कांतारा चॅप्टर 1'साठी ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत. शॉर्टलिस्ट केलेल्या कलाकारांना ऑडिशनसाठी बोलावले जाणार आहे.'', असे निर्मात्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

'कांतारा 2' टीझर : ऋषभ शेट्टी स्टारर 'कांतारा 2' या चित्रपटाच्या प्रीक्वलचा टीझर आणि फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा टीझर हा चाहत्यांना खूप आवडला आहे. 'कांतारा 2' चित्रपटाची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'कांतारा 2'च्या टीझरच्या पोस्टवर अनेकजणांनी कमेंट करून या चित्रपटाला रिलीजपूर्वीचं ब्लॉकबस्टर म्हणत आहे. ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट 125 कोटीच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत ऋषभ शेट्टी दिसेल. हा चित्रपट 2024मध्ये प्रदर्शित होईल. 2022 मध्ये रिलीज झालेला 'कांतारा'चं फक्त 16 कोटी बजेट होतं. या चित्रपटानं जवळपास 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर 12 व्या दिवशीही घोडदौड सुरूच
  2. अक्षय कुमार बनला क्रिकेट संघाचा मालक, 'आयएसपीएल'मध्ये घेतला श्रीनगरचा संघ
  3. 'जमाल कुडू' गाण्याची स्टेप्स कशी सूचली याचा बॉबी देओलनं केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.