ETV Bharat / entertainment

Ranbir Alia wedding : रणबीर आणि आलियाचे 'लग्न' नकली, कंगना रणौतचे नवे टीकास्त्र - अभिनेत्री कंगना रणौत

बिनधास्त विधाने करण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न नकली असल्याचे म्हटलंय. कंगनाच्या या खळबळ माजवणाऱ्या विधानामुळे बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Ranbir Alia wedding
रणबीर आणि आलियाचे 'लग्न' नकली
author img

By

Published : Jul 18, 2023, 5:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहत असते. लेटेस्ट इनस्टाग्राम स्टोरीमध्ये कोणाचेही थेट नाव न घेता एका बनावट पती पत्नीवर टीकास्त्र सोडले आहे. ज्या प्रकारचे वर्णन तिने या जोडीचे केले आहे त्यावरुन ही जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट असल्याचा तर्क लावला जात आहे. काही दिवसापूर्वी नीतू कपूर लंडनमध्ये होत्या. त्यांच्या वाढदिवसासाठी रणबीर एकटाच लंडनला गेला होता आणि आलिया आपल्या मुलीसोबत मुंबईतच थांबली होती. याचाही उल्लेख या पोस्टमध्ये नकळत दिसतो.

कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय की, 'नकली नवरा बायकोची आणखी एक बातमी. ते दोघेही वेगवेगळ्या जागेत राहात असतात आणि दाखवतात की ते जोडपे आहेत. हे जोडपे न बनलेल्या चित्रपटांच्या घोषणांबाबत फेक न्यूज पसरवत असतात. मिंत्रा हा स्वतःचा ब्रँड असल्याचे सांगत असतात.'

anbir Alia wedding
रणबीर आणि आलियाचे 'लग्न' नकली असल्याचा कंगनाचा इशारा

कंगनाने पुढे लिहिलंय की, 'याशिवाय कोणीही असे लिहिले नाही की त्याने कशा प्रकारे अलिकडच्या सुट्टीमध्ये पत्नी आणि मुलीकडे दर्लक्ष केले. खरंतर हा तथाकथित पती मला टेक्स्ट पाठवून भेटायला बोलवत होता. या नकली जोडीचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.'

कंगनाने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, 'चित्रपटांचे प्रमोशन, पैसे कमावणे आणि कामासाठी जेव्हा कोणी लग्न करत असतात तेव्हा असेच होते. त्याला वचन देण्यात आले होते की पापाच्या परीसोबत विवाह केल्यास त्याला ट्रायालॉजी ( तीन चित्रपटांचा एकत्रीत गुच्छ) त्याला रिटर्नमध्ये मिळणार आहे. या ट्रायालॉजी चित्रपटाचा डबा बंद झाला आहे आणि आता या नकली लग्नातून बाहेर पडायची त्यांची इच्छा आहे.' हा ट्रायालॉजी चित्रपट म्हणजे ब्रम्हास्त्र असल्याचा तर्क लावला जात आहे.

अभिनेत्री कंगनाने आणखी पुढे लिहिताना म्हटलंय की, 'परंतु दुःखद गोष्ट ही आहे की आता यातून बाहेर पडण्याचा कोणताच रस्ता शिल्लक राहिलेला नाही. आता त्याला आपली पत्नी आणि मुलीवर फोकस केले पाहिजे. हा भारत आहे, इथे एकदा लग्न झाले की झाले. आता तरी सुधरा.'

हेही वाचा -

१. Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर भूमी बनणार पर्यावरण रक्षक ; वाढदिवसानिमित्य घेतला खास निर्णय...

२. Car Rally For Project K : 'प्रोजेक्ट के'साठी अमेरिकेत कार रॅली, प्रभासच्या चाहत्यांमध्ये संचारला उत्साह

३. Aditya And Ananya : आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे लिस्बनमधील रेस्टॉरंटमध्ये संभाषणात हरवले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.