ETV Bharat / entertainment

हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांची नवीन गझल 'दूरीयां...' प्रेक्षकांच्या भेटीला

गायक हरिहरन यांच्या गझल गायनाच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. आता हरिहरन 'दूरीयां...' ही एक नवीन गझल घेऊन आले आहेत. ज्यात गायिका साधना जेजुरीकर यांनी स्वरसाथ दिली आहे.

author img

By

Published : Mar 18, 2023, 11:58 AM IST

Etv Bhaहरीहरन आणि साधना जेजुरीकर यांची नवीन गझलrat
हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांची नवीन गझल

मुंबई - भारतात गझल गायकी करणारे मोजकेच गायक सापडतील आणि त्यामध्ये हरिहरन यांचे नाव खूप वर आहे. त्यांच्या अप्रतिम गायकीचे अनेक चाहते आहेत, जे जगभरात पसरलेले आहेत. आता हरिहरन 'दूरीयां...' ही एक नवीन गझल घेऊन आले आहेत ज्यात गायिका साधना जेजुरीकर यांनीही त्यांना साथ दिली आहे. मखमली आवाजाचे धनी असलेले गायक हरिहरन यांनी गायलेल्या गझलवर सांगितिक विश्वातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'दूरीयां...' ची निर्मिती साधना जेजुरीकर यांची असून ती समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी पिकल म्युझिकच्या बॅनरखाली प्रकाशित केली आहे. हरिहरन नेहमीच नवीन काही शिकण्याची इच्छाशक्ती ठेवतात त्यामुळेच त्यांनी काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात केले आहेत. गायिका साधना जेजुरीकर यांच्या सोबत गायलेल्या या गझलला अल्पावधीतीच रसिकांची पसंती मिळत आहे. ही गझल ऐकल्यावर कळते की आजही हरिहरन संगीतप्रेमींच्या मनावर का अधिराज्य गाजवत आहेत.

हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांचे आवाज तयारीचे असून त्यांनी प्रत्येक शब्द अर्थानुरुप गायला आहे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट गायकीच्या आधारे या गझलला न्याय दिला आहे. 'दूरीयां...'बाबत हरीहरन यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, 'माझं आणि गझल गायकीचे एक अनोखे नाते आहे. कोणतीही गझल गाताना मला आत्मिक समाधान मिळत असते. आजवर मी बऱ्याच गझल् गायल्या आहेत, परंतु 'दूरीयां...' मध्ये एक विलक्षण अनोखी गोष्ट आहे. या गझलच्या मदन पाल यांच्या शब्दांना न्याय मिळवून देणं माझं आध्य कर्तव्य होतं ते मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. कैलाश गंधर्व यांची संगीतरचना अद्भुत असून ती गाताना मला आनंदाची अनुभूती मिळाली. समर्पक शब्दरचना आणि अद्भूत संगीतरचना यांचा मिलाफ म्हणजे 'दूरीयां...'. रसिक माझ्या या प्रयत्नांनाही पाठिंबा देतील अशी मला आशा आहे.'

साधना जेजुरीकर म्हणाल्या की, 'गझल ची आवड तरुणाईमध्ये आहे हे बघून आनंद होतो. 'दूरीयां...' ही गझल आजच्या काळातील तरुण संगीतप्रेमींना भावेल. मी याची निर्मिती करताना रसिकांची आवड लक्षात घेतली होती. आजच्या काळात प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन कर्णमधूर संगीतरचनेला दर्जेदार निर्मितीमूल्यांची जोड मिळेल याची काळजी घेतली गेली. या गझल ला हरिहरन सारख्या दिग्गज कलाकाराचा स्पर्श झाला असल्यामुळे या गझल ला चार चाँद लागले आहेत. माझ्यासाठी तर हा दुग्धशर्करा योग आहे कारण मला त्यांच्यासोबत गाण्याची संधी प्राप्त झाली.'

कैलाश पवार यांनी या गझलचा व्हिडिओ दिग्दर्शित केला असून, त्याचे संकलन सुद्धा केले आहे. या व्हिडिओत हरीहरन आणि साधना जेजुरीकर यांच्यासोबत हरीश वांगीकर आणि ऐश्वर्या माने हे कलाकार सुद्धा आहेत. या व्हिडिओ चे छायांकन प्रतीक बडगुजर यांनी केले असून कोरिओग्राफी प्रमोदकुमार बारी यांची आहे. हरिहरन आणि साधना जेजुरीकर यांची गझल 'दूरीयां...' पिकल म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

हेही वाचा - Bhalchandra Kulkarni Passed Away : अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; कोल्हापूरात घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.