ETV Bharat / entertainment

Gadar 2 vs OMG 2 box office collection day 15 : रिलीजच्या १५व्या दिवशी 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'च्या कमाईचा वेग मंदावला...

सनी देओल स्टारर 'गदर २' आणि अक्षय कुमार स्टारर 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत होते. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे.

Gadar 2 vs OMG 2
गदर २ आणि ओ माई गॉड २
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 12:47 PM IST

मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा अ‍ॅक्शन ड्रामा 'गदर २' आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ओ माय गॉड २' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर 'ओ माय गॉड २'ने देखील १०० कोटींहून अधिक कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. मात्र, तिसऱ्या आठवड्यात या दोन्ही चित्रपटांच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २'ने रिलीजच्या १५ व्या दिवशी रुपेरी पडद्यावर किती कोटींचा व्यवसाय हे जाणून घेऊया...

'गदर २' ची १५व्या दिवशीची कमाई : सनी देओलच्या चित्रपटाची क्रेझ हा प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. २००१ मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वल असलेल्या 'गदर २'ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आजही जात आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच रुपेरी पडद्यावर नोटा छापल्या. मात्र तिसऱ्या आठवड्यात 'गदर २'च्या कमाईचा वेग मंदावला असून कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळत आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, 'गदर २'ने प्रदर्शनाच्या १५व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी ६.७० कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, 'गदर २'ची एकूण कमाई ४२५.८० कोटी रुपयांवर गेली आहे.

'ओ माय गॉड २'ची १५व्या दिवशीची कमाई : अक्षय कुमार 'ओ माय गॉड २'मध्ये शिवदूतच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट शालेय लैंगिक शिक्षणावर आधारित आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाला अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या चित्रपटाने 'ए' सर्टिफिकेट मिळविले. तसेच या चित्रपटाला सनी देओलच्या 'गदर २' सोबत टक्कर द्यावी लागली. यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले, मात्र आता तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'ओ माय गॉड २'ची अवस्था दयनीय झाली आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या १५व्या दिवशी १.८० कोटीची कमाई केली आहे. यासह, 'ओ माय गॉड २'चे एकूण कलेक्शन १२८.२२ कोटी रुपयांवर गेली आहे.

हेही वाचा :

  1. Actor Milind Safai passes away ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; मराठी मालिकांसह चित्रपटांमध्ये पाडली होती छाप
  2. National Film Awards 2023 : 'हे' २ मराठी चित्रपट ठरले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ चे मानकरी; जाणून घ्या असं काय आहे या चित्रपटात...
  3. Seema Haider News: सीमा-सचिनच्या चित्रपटाचं शीर्षकच इम्पानं नाकारलं; निर्माते म्हणाले, 'मनसेमुळे...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.