ETV Bharat / entertainment

GADAR 2 SCREENING : सनी देओलच्या 'गदर २'चे सैनिकांसाठी खास स्क्रिनिंग, जवानांच्या घोषणांनी थिएटर दणाणले

अभिनेता सनी देओलने गदर २ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग भारतीय सैन्यदलासाठी आयोजित केले होते. यावेळी तारा सिंग पडद्यावर करत असलेला पराक्रम पाहून सैनिकांनी हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

GADAR 2  SCREENING
सनी देओलच्या 'गदर २'चे सैनिकांसाठी खास स्क्रिनिंग
author img

By

Published : Aug 9, 2023, 6:29 PM IST

मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' ची आता सध्या जबरदस्त क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. या चित्रपटाची चर्चा ही सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. तारा सिंग आणि सकिना ही जोडी २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर परत येत आहे. 'गदर २' चित्रपटाने आगाऊ बुकिंग तिकिटे १ लाखांहून अधिक विकली गेली आहेत. 'गदर २' च्या निर्मात्यांनी भारतीय सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग देखील आयोजित केले होते.

भारतीय लष्कराकडून चांगला प्रतिसाद : सनी देओलने स्वतः हा चित्रपट भारतीय सैन्यासोबत पाहिला. त्याचबरोबर 'गदर २' या चित्रपटाला भारतीय लष्कराकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराच्या जवानांनी चित्रपट पाहिल्यानंतर खूप टाळ्या वाजवल्या होत्या. दरम्यान चित्रपटातील देशप्रेमाची दृष्ये पाहून भारतीय लष्कराची छाती उंच झाली आणि थिएटरमध्येच हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. सनीसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आणि अमिषा पटेल देखील भारतीय सैन्यासाठी 'गदर २'च्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित होते.

'गदर २ प्रचंड प्रतिसाद : 'गदर २'बाबत देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कंगना रणौतनेही 'गदर २' हा चित्रपट पहिल्या दिवशी खूप कमाई करेल असा दावा केला आहे. 'गदर' हा २ वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरेल असेही कंगनाने म्हटले आहे. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर- एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या २२ वर्षांनंतर, 'गदर २' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्यामुळे सनी देओलमध्ये खूप क्रेझ आता निर्माण झाला आहे. २२ वर्षांपूर्वी तारा सिंग बनल्याने सनी देओलने जो कहर केला होता तो आजही कायम राहावा, अशी चाहत्यांना आशा आहे.

हेही वाचा :

  1. Dharmaveer 2 : 'धर्मवीर २' चित्रपटाची मंगेश देसाईने केली घोषणा, उलगडणार 'साहेबां'च्या हिंदुत्त्वाची गोष्ट
  2. Shiney Ahuja Rape Case : बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजाला मोठा दिलासा, पासपोर्ट नूतनीकरणास मंजुरीचे आदेश
  3. Jailer advance booking: 'जेलर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच १९.४४ कोटींची कमाई, पिक्चर अभी बाकी है

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.