ETV Bharat / entertainment

Indian 2 major update : कमल हासन स्टारर 'इंडियन 2'ची इंट्रो'सह पहिली झलक लवकरच मिळणार पाहायला - इंडियन 2

Indian 2 major update : अभिनेता कमल हासन आणि दिग्दर्शक शंकर यांच्या 'इंडियन 2'ची इंट्रो'सह पहिली झलक पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्टरही रिलीज केले आहे, ज्यामध्ये कमल हासन आहे.

Indian 2 major update
इंडियन 2 अपडेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 4:10 PM IST

मुंबई - Indian 2 major update : दिग्गज अभिनेता कमल हासन आणि शंकर यांच्या 'इंडियन 2' या चित्रपटाची पहिली झलक 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. दरम्यान आता या चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शननेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. लायका प्रॉडक्शन ट्विटमध्ये लिहिले आहे, 'सेलिब्रेशन लवकर सुरू झाले आहे. 3 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या 'इंडियन-2 इंट्रो साठी सज्ज व्हा. 'इंडियन-2'ची पहिली झलक.' याशिवाय निर्मात्यांनी 'इंडियन 2'मधील एक पोस्टरही रिलीज केले आहे, ज्यामध्ये कमल हासन दिसत आहेत.

चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक : 'इंडियन 2'चे निर्माते 3 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करणार आहे. कमल हसन पुन्हा एकदा 'इंडियन 2' मधून रुपेरी पडद्यावर अ‍ॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे. कमल हासन व्यतिरिक्त या चित्रपटात काजल अग्रवाल, प्रिया भवानी शंकर, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह आणि बॉबी सिम्हा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदरनं या चित्रपटाला संगीत दिले आहे. 7 नोव्हेंबर रोजी कमल हासनचा वाढदिवस आहे. चाहते कमल हसनची एक झलक पाहण्यासाठी सध्या आतुर झाले आहेत. याशिवाय शेअर केलेल्या पोस्टमध्ये कमेंट करून चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत.

'इंडियन 2' चित्रपटाबद्दल : 'इंडियन 2', हा चित्रपट 'इंडियन'चा सीक्वल आहे. हा चित्रपट 1996मध्ये आला होता. या चित्रपटामध्ये कमल हासन एक वृद्ध स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत होते, जे भ्रष्टाचाराविरूद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतात. पहिल्या भागाप्रमाणे या चित्रपटातही मजबूत संदेश असण्याची शक्यता आहे. 'इंडियन 2'मध्ये नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुबास्करन अल्लिराजा आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहेत. 'इंडियन 2' चित्रपटाच्या शुटिंगला 2019 मध्ये जानेवारीत सुरुवात झाली. या चित्रपटाचे शूटिंग चेन्नई, राजमुंद्री, भोपाळ, ग्वाल्हेर तिरुपती, चेन्नई, जोहान्सबर्ग आणि तैवान या ठिकाणी पार पडले आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss 17 Updates: 'बिग बॉस 17'मध्ये होणार आता धमाका ; प्रोमो झाला व्हायरल...
  2. Deepika Padukone halarious Video : दीपिका पदुकोण दिलं ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर; व्हिडिओ झाला व्हायरल...
  3. kangana Ranaut Tejas : 'तेजस' पाहण्यासाठी कंगनानं चाहत्यांना थिएटरमध्ये जाण्याचे प्रेक्षकांना केलं आवाहन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.