ETV Bharat / entertainment

Poonam pandey: पूनम पांडेच्या घराला लागली आग ; मोलकरणीनं वाचविलं पाळीव कुत्र्याचे प्राण... - पूनम पांडेच्या घराला लागली आग

Poonam pandey: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेच्या घराला अचानक आग लागली. हे घडलं तेव्हा तिचा पाळीव कुत्रा सीझर हा घरात होता. या कुत्र्याला मोलकरणीनं वाचवलं आहे. दरम्यान आता पूनमच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Poonam pandey
पूनम पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 2:01 PM IST

मुंबई - Poonam pandey: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्ड अ‍ॅक्ट्समुळे अनेकदा चर्चेत असते, दरम्यान आता तिच्याबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे. नुकतीच पूनम पांडेच्या घराला भीषण आग लागली होती. आता तिच्या घरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो खरोखरच भीतीदायक आहेत. घरातील निम्म्याहून अधिक साहित्य जळून खाक झालं आहे, सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा लागली होती त्यावेळी पूनमच्या घरात तिचा पाळीव कुत्रा होता, ज्याला वाचवण्यात आला आहे. सध्या या कुत्र्याला तिने तिच्या बहिणीकडे सोपवलं आहे.

पूनम पांडेच्या घराला कशी लागली आग : घराला एवढी मोठी आग कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन विभाग सध्या करत आहे. पूनम घरात नसताना तिच्या घरात ही आग लागली होती. यानंतर तिच्या सोसायटीतील एका मुलानं तातडीनं अग्निशमन दलाला फोन करून अपघाताची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. पूनमचा पाळीव कुत्रा सीझरला तिच्या मोलकरणीनं वाचवलं. पूनम पांडेच्या घरातील लावलेले फोटो आणि सामान जवळजवळ जळून राख झाल्याचं दिसून येत आहे.

अनेक युजर्सनी कमेंट केली : पूनमच्या घरातील फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा अनेक जणांनी कमेंट करून चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरनं लिहिलं की, 'देवाचे आभार की कुटुंबातील सदस्य आणि तिचा पाळीव कुत्रा सुरक्षित आहे. दुसर्‍या यूजरनं लिहिलं की, 'देवाच्या कृपेनं मोलकरीण तिथे आली आणि कुत्र्याला वाचवलं.' दुसरीकडे काही लोकांनी अशा प्रसंगी असंवेदनशीलता दाखवून पूनमला ट्रोल केलं आहे. एका यूजरनं लिहिलं, 'पूनम पांडे वाचली नाही ना?' दुसऱ्यानं कमेंटमध्ये लिहलं, 'इतकी जर हॉट असणार ती तर सर्वच जळेल' तर आणखी एकानं लिहलं 'हाय गर्मी' अशादेखील कमेंट या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. Jab We Met Sequel: 'जब वी मेट' चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
  2. Deepika Kiss SRK :दीपिका पदुकोणने घेतलं शाहरुखच्या गालाचे चुंबन, खिळल्या सर्वांच्या नजरा
  3. Jawan Box Office Collection Day 10 : 'जवान'नं देशांतर्गत 400 कोटीचा टप्पा केला पार ; जगभरात 700 कोटीची कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.