ETV Bharat / entertainment

Dream girl २ box office collection day ११ : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू... - आयुष्मान खुराना

Dream Girl 2 Box Office Collection Day 11 : 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटीचा टप्पा ओलांडणार आहे. दरम्यान आता हा चित्रपट रिलीजच्या 11व्या दिवशी किती कमाई करू शकतो, हे जाणून घेऊया...

Dream Girl 2 Box Office Collection Day 11
ड्रीम गर्ल 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 11:10 AM IST

Dream Girl 2 Box Office Collection Day 11 : 'ड्रीम गर्ल 2' आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' हा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' ने पहिल्या 4 दिवसात चित्रपटाचे बजेट वसूल केले. आता हा चित्रपट 100 कोटीची कमाई करण्यापासून काही पाऊलावर आहे. 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचे एकूण बजेट 35 कोटी होते. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि आजपर्यंत या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. 'ड्रीम गर्ल 2'मधील आयुष्मान खुरानाचा अभिनय हा प्रेक्षकांना आवडत आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर हे देखील कलाकार आहेत.

'ड्रीम गर्ल 2'चे कलेक्शन : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.69 कोटी, दुसऱ्या दिवशी 14.02 कोटी, तिसऱ्या दिवशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 5.42 कोटी, पाचव्या दिवशी 5.87 कोटी, सहाव्या दिवशी 7.5 कोटी, सातव्या दिवशी 7.5 कोटी, आठव्या दिवशी 4.7 कोटी, नव्या दिवशी 6.36 कोटी , दहाव्या दिवशी 8.34 कोटीचा गल्ला जमावला आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 86.06 कोटी इतके झाले आहे. हा चित्रपट अकराव्या दिवशी 3.00 कोटीची कमाई करू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 89.40 कोटी होईल.

'ड्रीम गर्ल'चा सीक्वल : 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 सप्टेंबरपर्यत चांगली कमाई करू शकतो, कारण त्यानंतर शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. 'जवान' चित्रपटाची बुकिंग ही सध्या खूप झपाट्याने होत आहे. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 2019मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल'चा सीक्वल आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि नुसरत भरूचा हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. आता 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट देखील रूपेरी पडद्यावर धमाल करत आहे. 'ड्रीम गर्ल 2' मधील गाणे देखील खूप हिट झाली आहेत. याशिवाय हा चित्रपट येणाऱ्या दिवसात खूप कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी'ने केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....
  2. chandramukhi 2 trailer released : कंगना रणौतच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...
  3. Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan: 'गदर 2'च्या पार्टीत कार्तिकनं एक्स गर्लफ्रेंड साराला मारली मिठी , व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.